T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ साठी पाकिस्तान वगळता सर्व देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाची घोषणा केली. मात्र, अद्याप शेजारील देश पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला नाही. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान विश्वचषक खेळणार हे निश्चित आहे. खरे तर पाकिस्तानने अधिकृतपणे संघाची घोषणा केली नसली तरी १५ सदस्यीय संघाची यादी आयसीसीकडे सोपवली असल्याचे कळते. पाकिस्तानातील 'जिओ न्यूज'ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हवाल्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.
पाकिस्तानने आपल्या १५ सदस्यीय संघात पाच वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे, तर चार अष्टपैलू खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज हारिस रौफ सध्या क्रिकेटपासून दूर असला तरी तो विश्वचषक खेळणार आहे. तर राजीनामा माघारी देऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेले मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम विश्वचषकात दिसतील.
पाकिस्तानचा संभाव्य संघ -बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, मोहम्मद रिझवान, उस्मान खान, आझम खान, इमाद वसीम, शादाब खान, इफ्तिखार अहमद, अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, नसीम शाह, अब्बास आफ्रिदी आणि हारिस रौफ.
राखीव खेळाडू - सलमान अली अघा, हसन अली आणि इरफान खान.
दरम्यान, पाकिस्तानी संघ २२ मे पासून मायदेशात इंग्लंडविरूद्ध चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या संघाची अधिकृतपणे घोषणा करेल. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख २५ मे आहे.
विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -६ जून - पाकिस्तान विरूद्ध अमेरिका, डल्लास९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंडस, लॉदरहील
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ