T20 World Cup 2024 CAN vs IRE Live : खराब सुरुवातीनंतर कॅनडाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. निकोलस किर्टन व श्रेयस मोव्वा यांनी कॅनडाचा अडखळलेला डाव सावरला आणि ४ बाद ५३ धावांवरून आयर्लंडसमोर तगडं आव्हान उभं केलं. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अ गटात पाकिस्तानला पाचव्या क्रमांकावर ढकलेल.
अमेरिकेने अ गटात काल पाकिस्तानला पराभवाचा धक्का देऊन तालिकेतील गणित चुरशीचे बनवले आहे. कॅनडा आणि आयर्लंड यांच्यात आज सामना होतोय आणि अ गटातील या संघाना विजयाचे खाते उघडता आलेले नाही. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवनीत धलिवाल ( ६) हा तिसऱ्याच षटकात मार्क एडरला विकेट देऊन परतला. दुसऱ्या षटकात धलिवालचा झेल पकडला गेला होता, परंतु आयर्लंडच्या खेळाडूंनी DRS न घेतल्याने त्याला जीवदान मिळाले होते. कॅनडाचे फलंदाज सावध खेळ करताना दिसले. आरोन जॉन्सन व प्ररगट सिंग हे सेट होऊन धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात दिसले. मात्र, जॉन्सन ( १४) मोठा फटका मारण्यच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेलबाद झाला.
परगटही १८ धावा करून क्रेग यंगच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने कॅनडाला ४२ धावांवर तिसरा धक्का बसला. दीलप्रित बाजवा ( ७) गॅरेथ डेलनीच्या पहिल्याच चेंडूवर सोपा झेल देऊन माघारी परतला. कॅनडाने १० षटकांत ४ बाद ६३ धावा केल्या. निकोलस किर्टन व श्रेयस मोव्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करून कॅनडाची गाडी रुळावर आणली. १९व्या षटकात ७५ धावांची ही भागीदारी तुटली. किर्टन ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४९ धावांवर झेलबाद झाला. बॅरी मॅककार्थीने या षटकात दोन विकेट्स घेतल्या. मोव्वाने ( ३७*) शेवटपर्यंत खेळ करून संघाला ७ बाद १३७ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: T20 World Cup 2024 CAN vs IRE Live : Nicholas Kirton ( 49) & Shreyas Movva ( 37 ) 75 runs partneship, Canada set 138 target to Ireland
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.