Join us

T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा

T20 World Cup 2024 CAN vs IRE : कॅनडाने आयर्लंडचा पराभव करून इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 07:16 IST

Open in App

T20 World Cup 2024 CAN vs IRE : गुरुवारी यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २४ तासांच्या आत दुसरा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून सर्वांना अवाक् केले. अशातच शुक्रवारी झालेल्या सामन्यात कॅनडाने तगड्या आयर्लंडला पराभवाचे पाणी पाजले. आयर्लंडचा हा अ गटातील दुसरा पराभव ठरल्याने त्यांचे Super 8 चे आव्हान संपुष्टात आले आहे. कॅनडाने हा विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेताना पाकिस्तानला गुणतालिकेत खाली ढकलले आहे. कॅनडाचा हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. दमदार विजयानंतर कॅनडाच्या कर्णधाराने पाकिस्तानी संघाला इशारा दिला आहे. 

आयर्लंडने नाणेफेक जिंकून कॅनडाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी निर्धारित २० षटकांत ७ बाद १३७ धावा केल्या. कॅनडाने दिलेल्या या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडला अपयश आले. ते निर्धारित २० षटकांत ७ बाद केवळ १२५ धावा करू शकले आणि कॅनडाने १२ धावांनी विजय मिळवला. धिम्या गतीने धावा केल्यानंतर कॅनडाच्या गोलंदाजांनी सांघिक कामगगिरी करत विजय साकारला. हा त्यांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकातील पहिलाच विजय आहे. 

कॅनडाचा आत्मविश्वास वाढलाकॅनडाने आयर्लंडचा पराभव करताच कर्णधार साद बिन जाफरचा आत्मविश्वास वाढला. त्यांचा पुढील सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. कॅनडाचा कर्णधार म्हणाला की, मला माझ्या संघाचा खूप अभिमान वाटतो. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या इतिहासात हा आमचा पहिलाच विजय आहे. आम्ही पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. जोरदार पुनरागमन करून त्यांना आव्हान देऊ. 

दरम्यान, पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात ११ तारखेला सामना होणार आहे. या आधी पाकिस्तानी संघ बलाढ्य भारताविरूद्ध खेळेल. पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेविरूद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शेजाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024कॅनडाआयर्लंडपाकिस्तान