Virender Sehwag & Irfan Pathan On MS Dhoni :महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) खुल स्लो खेळतो, त्याने आता निवृत्त व्हायला हवे, अशी टीका सातत्याने केली जाते. पण, IPL च्या यंदाच्या सीझनमध्ये धोनी एका वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसतोय. धोनीने IPL 2024 मध्ये CSK च्या आतापर्यंतच्या सर्व सामन्यात दमदार फलंदाजी केली आहे. विशेषत: धोनीला अखेरच्या ओव्हर्समध्ये रोखणे विरोधी गोलंदाजांना अशक्यप्राय ठरत आहे.
या मोसमात आतापर्यंत महेंद्रसिंग धोनीने 8 सामन्यांत 6 वेळा फलंदाजी केली अन् एकही गोलंदाज त्याला बाद करू शकला नाही. कॅप्टन कूलने 8 सामन्यात 35 चेंडूत 91 धावा केल्या आहेत. ही दमदार खेळी पाहून माहीने टी-20 विश्वचषकात खेळावे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. अनेक माजी क्रिकेटपटूदेखील महेंद्रसिंग धोनीने 2024 च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
T20 विश्वचषकात माहीची वाईल्ड कार्ड एंट्री होणार?
वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि वरुण आरोन यांसारख्या माजी क्रिकेटपटूंचे मत आहे की, या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात माहीला वाईल्ड कार्ड एंट्री मिळायला हवी. इरफान पठाण म्हणाला की, धोनीला टी-20 विश्वचषकात खेळायचे असेल, तर त्याला कोणीही नकार देणार नाही. पण, असे होणे शक्य नाही. पण, शक्य झालेच, तर त्यावर कोणीही आक्षेप घेणार नाही. तर, वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, या हंगामात माहीने 250 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये माहीपेक्षा चांगला यष्टिरक्षक कोण असू शकत नाही.
रोहित शर्मा काय म्हणाला?
अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅकवर वक्तव्य केले होते. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटवटू गिल ख्रिस्टसोबत ऑनलाईन बोलत होता. यावेळी रोहितला विचारण्यात आले की, कोणत्या यष्टीरक्षकाला टी-20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळेल? रोहित म्हणाला, धोनीला कमबॅकसाठी पटवणे अवघड आहे. तो अमेरिकेत येतोय, पण गोल्फ खेळायला. रोहित शर्माचे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
Web Title: T20 World Cup 2024: Dhoni to play T-20 World Cup? Will Mahi have a wild card entry? Rohit's statement sparks discussion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.