क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर यांची फटकेबाजी; पण इंग्लंडसमोर अन्य फलंदाजांची शरणागती 

आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश हे, या संपूर्ण स्पर्धेत डोकेदुखीचं कारण ठरलेलं आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 09:34 PM2024-06-21T21:34:35+5:302024-06-21T21:41:06+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 ENG vs SA Live Marathi : Quinton de Kock, David Miller's brillient batting; But other batsmen surrender before England, South Africa set 164 runs target | क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर यांची फटकेबाजी; पण इंग्लंडसमोर अन्य फलंदाजांची शरणागती 

क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर यांची फटकेबाजी; पण इंग्लंडसमोर अन्य फलंदाजांची शरणागती 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 ENG vs SA Live Marathi : क्विंटन डी कॉकने फटकेबाजी करूनही दक्षिण आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांनी नियमित विकेट फेकल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांना सामन्यात पुनरागमन करण्याची आफ्रिकेने संधी दिली. आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश हे, या संपूर्ण स्पर्धेत डोकेदुखीचं कारण ठरलेलं आहे. पुन्हा एकदा डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून संघाला सन्मानजनक धावापर्यंत पोहोचवले. 


इंग्लंडने सुपर ८च्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्यात फॉर्म गवसलेल्या क्विंटन डी कॉकने इंग्लिश गोलंदाजांना हैराण केले. जोफ्रा आर्चरने चौथ्या षटकात वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकून पाहिले, परंतु क्विंटनने ६,६,४ असे उत्तुंग फटके खेचले. त्यानंतर रिझा हेंड्रीक्सनेही ( १९)  हात मोकळे करताना त्या षटकात एकूण २१ धावा मिळवल्या. आफ्रिकेने पॉवर प्लेमध्ये ६३ धावा केल्या. क्विंटनने २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. ५८ धावांवर मार्क वूडने त्याचा झेल पकडला होता, परंतु चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याने अम्पायरला निर्णय बदलावा लागला. 


पण, जोफ्रा आर्चरने त्याची विकेट मिळवून दिली. क्विंटन ३८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ६५  धावा केल्या. हेनरिच क्लासेन ( ९) व डेव्हिड मिलर यांची जोडी दुर्दैवाने तुटली. व्हाईड बॉलवर नॉन स्ट्रायकर एंडवरून मिलरने एक धावेसाठी कॉल दिला आणि क्लासेन पळाला. यष्टिरक्षक जॉस बटलरने अचून थ्रो करून क्लासेनला रन आऊट केले. आदिल राशिदच्या फिरकीवर कर्णधार एडन मार्कराम ( १) त्रिफळाचीत झाला. संघाच्या ९२ धावांवर क्विंटनची विकेट पडल्यानंतर आफ्रिकेच्या डावाला गळती लागली. डेव्हिड मिलरने २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांची फटकेबाजी करून संघाला सावरले.  जोफ्रा आर्चरने २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर विकेट्स घेतल्या. आफ्रिकेला ६ बाद १६३ धावा करता आल्या. 

Web Title: T20 World Cup 2024 ENG vs SA Live Marathi : Quinton de Kock, David Miller's brillient batting; But other batsmen surrender before England, South Africa set 164 runs target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.