इंग्लंडने ९.४ षटकांत विजय मिळवला, उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला! आफ्रिका, विंडीजवर दडपण

इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या त्यांच्या शेवटच्या लढतीत अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 10:33 PM2024-06-23T22:33:56+5:302024-06-23T22:35:14+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 ENG vs UAE Live : ENGLAND BECOMES THE FIRST TEAM TO QUALIFY INTO SEMIS IN T20I WORLD CUP 2024, beat USA in 9.4 overs | इंग्लंडने ९.४ षटकांत विजय मिळवला, उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला! आफ्रिका, विंडीजवर दडपण

इंग्लंडने ९.४ षटकांत विजय मिळवला, उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला! आफ्रिका, विंडीजवर दडपण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 ENG vs UAE Live : इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या त्यांच्या शेवटच्या लढतीत अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा नेट रन रेट हा ०.४१२ असा होता आणि वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका त्यांच्या पुढे होते. आता इंग्लंडने ४ गुणही कमावले आणि नेट रन रेटच्या (१.९९२ ) जोरावर उपांत्य फेरीतील स्थानही पक्के केले. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात उद्या होणारा सामना महत्त्वाचा असेल. आफ्रिका जरी ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असली तरी यजमान विंडीज ( २) विजयासह नेट रन रेट सुधारून उपांत्य फेरीत जाऊ शकतात.


इंग्लंडने अमेरिकेला ११५ धावांवर ऑल आऊट केले. आदिल राशिदने फिरकीचा चांगला मारा केला.  ख्रिस जॉर्डनने ( HAT-TRICK FOR CHRIS JORDAN) हॅटट्रिक घेतली. अमेरिकेचे सलामीवीर स्टीव्हन टेलर ( १२ ) व एँड्रीएस गौस ( ८) यांना ४३ धावांवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. नितीश कुमार ( ३०) आणि कर्णधार आरोन जॉन्स ( १०) यांना आदिल राशिदने त्रिफळाचीत केले. राशिदने ४-०-१३-२ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हरमीत सिंग ( २१) याने चांगली फटकेबाजी करून कोरी अँडरसनला ( १९) साथ दिली. ख्रिस जॉर्डनने १९व्या षटकात हॅटट्रिक घेताना अमेरिकेचा संपूर्ण संघ ११५ धावांत तंबूत पाठवला. जॉर्डनने २.५-०-१०-४ अशी स्पेल टाकली. सॅम कुरनने दोन विकेट्स घेतल्या. अमेरिकेने ६ चेंडूंत ५ विकेट्स गमावल्या. 


प्रत्युत्तरात जॉस बटलर व फिल सॉल्ट यांनी पहिल्या ६ षटकांत ६० धावा चोपून नेट रन रेट प्रंचड सुधारण्याचा इरादा स्पष्ट केला. बटलरने आक्रमक फटकेबाजी करताना अर्धशतकही पूर्ण केले आणि इंग्लंडला ८.५ षटकांत १०३ धावाही उभ्या करून दिल्या. इंग्लंडने हे लक्ष्य १८.४ षटकांत पार करून उपांत्य फेरीचे तिकीट पूर्ण करता येणार होते आणि त्याच निर्धाराने आज त्यांनी फटकेबाजी केली. ८व्या षटकात बटलरने सलग ५ षटकार खेचले. इंग्लंडने ९.४ षटकांत बिनबाद ११७ धावा करून विजय पक्का केला. जॉस बटलर ३८ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या, तर फिल सॉल्ट २१ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: T20 World Cup 2024 ENG vs UAE Live : ENGLAND BECOMES THE FIRST TEAM TO QUALIFY INTO SEMIS IN T20I WORLD CUP 2024, beat USA in 9.4 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.