Join us  

"मला इथे बसून तुम्हाला काही सांगण्याची गरज वाटत नाही", जोस बटलर पत्रकारावर संतापला!

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरची संतप्त प्रतिक्रिया.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 10:49 AM

Open in App

सध्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. गतविजेत्या इंग्लंडने स्कॉटलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यापूर्वी इंग्लिश कर्णधार जोस बटलर आणि पत्रकारामध्ये बाचाबाची झाल्याचे कळते. इंग्लंडने अलीकडेच मायेदशात पाकिस्तानविरूद्ध ट्वेंटी-२० मालिकेत २-० असा विजय मिळवला. याशिवाय फिल सॉल्ट, विल जॅक्स आणि जोस बटलर यांसारख्या प्रमुख खेळाडूंनी आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी केली. केवळ इंग्लंडचेच नव्हे तर आयपीएलमध्ये इतर देशांतील खेळाडूंनी देखील अप्रतिम कामगिरी केली.

जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लिश संघाने मागील वर्षी भारतात झालेल्या वन डे विश्वचषकात निराशाजनक कामगिरी केली. यावरून बटलरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. याचाच दाखला देत एका पत्रकाराने बटलरला प्रश्न केला असता तो संतापला. वन डे विश्वचषकात इंग्लंडने पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्ससारख्या कमकुवत संघांविरुद्ध विजय मिळवले. मात्र, त्यांना अफगाणिस्तानविरूद्ध पराभव पत्करावा लागला. 

बटलरची संतप्त प्रतिक्रिया 'स्पोर्ट्स तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडचा कर्णधार पत्रकारावर संतापला. वन डे विश्वचषकातील खराब कामगिरी, यामुळे संघाच्या मनोबलावर परिणाम झाला आहे का? यावेळी काय रणनीती असेल? या प्रश्नावर बटलरने संतप्त प्रतिक्रिया देताना सुरुवातीला उत्तर देणे टाळले. मग ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे बटलरने सांगितले. पण प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारणा केली असता तो संतापला. "संघ काय आहे आणि मी संघात आहे की नाही हे सांगणार नाही. एक संघ म्हणून आम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याबद्दल मी खूप समाधानी आहे. मला इथे बसून तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही", असे इंग्लिश कर्णधाराने सांगितले.

विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ -जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, रीस टोप्ली, मार्क वुड.

टॅग्स :जोस बटलरट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024इंग्लंड