सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्याची जोरदार फटकेबाजी; अफगाणिस्तानसमोर तगडे लक्ष्य

रोहित शर्मा, विराट कोहली व रिषभ पंत ही आघाडीची फळी अपयशी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 09:44 PM2024-06-20T21:44:55+5:302024-06-20T21:50:05+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi : A 27 BALL FIFTY BY SURYAKUMAR YADAV ( 53), Hardik Pandya ( 32); India need to defend 181 against Afghanistan in Barbados | सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्याची जोरदार फटकेबाजी; अफगाणिस्तानसमोर तगडे लक्ष्य

सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्याची जोरदार फटकेबाजी; अफगाणिस्तानसमोर तगडे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi Update : रोहित शर्मा, विराट कोहली व रिषभ पंत ही आघाडीची फळी अपयशी ठरली. पण, सूर्यकुमार यादव ( SURYAKUMAR YADAV ) व हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अफगाणचा कर्णधार राशिद खान याने ३ महत्त्वाच्या विकेट्स घेऊन भारताला बॅकफूटवर फेकले होते, परंतु सूर्या-हार्दिक जोडीने कमाल करून दाखवली. सूर्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर हार्दिकनेही चांगली फटकेबाजी केली. 

विराट कोहलीची पराक्रमी कामगिरी, पण राशिद खानच्या गुगलीसमोर टीम इंडियाची कोंडी 


अफगाणिस्तानचा कर्णधार  राशिद खान ( Rashid Khan) याच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची कोंडी झालेली पाहायला मिळाली. रोहित शर्मा ( ८) पुन्हा एकदा डावखुऱ्या जलदगती गोलंदाजासमोर अपयशी ठरल्यानंतर राशिदने ३ विकेट्स घेतल्या. रिषभ पंत ( २०) , विराट कोहली ( २४) व शिवम दुबे ( १०)  माघारी परतले. विराट पुन्हा मोठी खेळी करण्यास चुकला असला तरी त्याने एक मोठा विक्रम नावावर नोंदवला. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ४०६६ धावांचा विक्रम नावावर करताना रोहितला ( ४०४९) मागे टाकले. सूर्यकुमार यादव व शिबम दुबे या खेळाडूंवर जबाबदारी होती आणि त्यांना  १४ चेंडूंत २८ धावा जोडता आल्या.


सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. १५व्या षटकापर्यंत संयमी खेळ करणाऱ्या या जोडीने गिअर बदलला. या दोघांनी ३७ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. सूर्या २८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर झेलबाद झाला. नवीन उल हकच्या गोलंदाजीवर १८व्या षटकात हार्दिक ( ३२ धावा, २४ चेंडूं, ३ चौकार व २ षटकार) झेलबाद झाला. रवींद्र जडेजा ७ धावांवर बाद झाला आणि फारुकीने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने शेवटच्या षटकांत ( १२) चांगली फटकेबाजी करून संघाला ८ बाद १८१ धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi : A 27 BALL FIFTY BY SURYAKUMAR YADAV ( 53), Hardik Pandya ( 32); India need to defend 181 against Afghanistan in Barbados

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.