T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi Update : रोहित शर्मा, विराट कोहली व रिषभ पंत ही आघाडीची फळी अपयशी ठरली. पण, सूर्यकुमार यादव ( SURYAKUMAR YADAV ) व हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अफगाणचा कर्णधार राशिद खान याने ३ महत्त्वाच्या विकेट्स घेऊन भारताला बॅकफूटवर फेकले होते, परंतु सूर्या-हार्दिक जोडीने कमाल करून दाखवली. सूर्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर हार्दिकनेही चांगली फटकेबाजी केली.
विराट कोहलीची पराक्रमी कामगिरी, पण राशिद खानच्या गुगलीसमोर टीम इंडियाची कोंडी
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान ( Rashid Khan) याच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची कोंडी झालेली पाहायला मिळाली. रोहित शर्मा ( ८) पुन्हा एकदा डावखुऱ्या जलदगती गोलंदाजासमोर अपयशी ठरल्यानंतर राशिदने ३ विकेट्स घेतल्या. रिषभ पंत ( २०) , विराट कोहली ( २४) व शिवम दुबे ( १०) माघारी परतले. विराट पुन्हा मोठी खेळी करण्यास चुकला असला तरी त्याने एक मोठा विक्रम नावावर नोंदवला. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ४०६६ धावांचा विक्रम नावावर करताना रोहितला ( ४०४९) मागे टाकले. सूर्यकुमार यादव व शिबम दुबे या खेळाडूंवर जबाबदारी होती आणि त्यांना १४ चेंडूंत २८ धावा जोडता आल्या.