टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल! रोहितने हुकूमी एक्का अखेर बाहेर काढला

भारतीय संघाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील Super 8 फेरीतील प्रवास आजपासून सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 07:30 PM2024-06-20T19:30:10+5:302024-06-20T19:35:34+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi : India will bat first, Kuldeep yadav gets his first game of the tournament, Moh. Siraj rested | टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल! रोहितने हुकूमी एक्का अखेर बाहेर काढला

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल! रोहितने हुकूमी एक्का अखेर बाहेर काढला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi Update : भारतीय संघाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील Super 8 फेरीतील प्रवास आजपासून सुरू होणार आहे. भारत-अफगाणिस्तान यांच्यात ब्रिजटाऊन येथे सामना होणार आहे. भारतीय संघ अ गटात चारही सामने जिंकून सुपर ८ मध्ये दाखल झाला आहे, तर अफगाणिस्तानने क गटात न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाला नमवून पुढे आला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया नक्की करणार नाही. 


भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची अपेक्षा होती, कारण ही खेळपट्टी फिरकीपटूला पोषक आहे. अशावेळी मोहम्मद सिराज किंवा अर्शदीप सिंग यांच्यापैकी एकाच्या जागी कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल यांना संधी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अफगाणिस्तानची फिरकी त्रिकुट राशीद खान, मोहम्मद नबी व नूर अहदम यांनी आतापर्यंत कमाल करून दाखवली आहे. हिच टीम इंडियाचे डोकेदुखी ठरू शकते. बार्बाडोसची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन असल्याचा रिपोर्ट इरफान पठाणने नाणेफेकीच्या वेळेस दिली. कुलदीप यादव सामन्यापूर्वी सराव करताना दिसला आणि त्यामुळे त्याला संधी मिळेल अशा शक्यता बळावल्या होत्या. 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ही खेळपट्टी न्यूयॉर्कपेक्षा चांगली असल्याचे मत रोहितने व्यक्त केले. कुलदीपचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आणि मोहम्मद सिराजला विश्रांती दिली गेली. कुलदीप यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना आज खेळणार आहे. 

भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा. अक्षर पटेल, कुलदीप यादव, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग  

Web Title: T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi : India will bat first, Kuldeep yadav gets his first game of the tournament, Moh. Siraj rested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.