T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi Update : अफगाणिस्तानचा कर्णधार व स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान ( Rashid Khan) याच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची कोंडी झालेली पाहायला मिळाली. रोहित शर्मा पुन्हा एकदा डावखुऱ्या जलदगती गोलंदाजासमोर अपयशी ठरल्यानंतर राशिदने ३ विकेट्स घेतल्या. रिषभ पंत, विराट कोहली व शिवम दुबे माघारी परतले. विराट पुन्हा मोठी खेळी करण्यास चुकला असला तरी त्याने एक मोठा विक्रम नावावर नोंदवला.
रोहित शर्माला बाद करताच अफगाणी गोलंदाजाचे 'John Cena' सेलिब्रेशन; हिटमॅनचा नकोसा विक्रम
रोहित शर्मा ( Rohit Sharma) अपयशी ठरल्याने साऱ्यांना धक्का बसला. अफगाणिस्तानविरुद्धच्या आजच्या सामन्यात रोहित अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. फझलहक फारुकीने कटर चेंडूवर रोहितला चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले. विराट कोहली व रिषभ पंत यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११च्या सरासरीने धावा कुटण्यास सुरुवात केली. रिषभचा ११ धावांवर नवीन उल हकने सोपा झेल टाकला. मोहम्मद नबी निराश दिसला. भारताच्या सहा षटकांत १ बाद ४७ धावा झाल्या. सातव्या षटकात कर्णधार राशिद खानच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रिषभ ( २० धावा, १० चेंडू, ४ चौकार) पायचीत झाला.
राशिदच्या पुढच्या षटकात आक्रमक फटका खेचण्याच्या प्रयत्नात विराटने विकेट फेकली. मोहम्मद नबीने सीमारेषेवर विराटचा ( २४) झेल टिपला आणि भारताला ६२ धावांवर तिसरा धक्का बसला. विराटचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयश कायम राहिले असले तरी त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ४०६६ धावांचा विक्रम नावावर करताना रोहितला ( ४०४९) मागे टाकले. सूर्यकुमार यादव व शिबम दुबे या खेळाडूंवर आता सर्व जबाबदारी होती. पण, राशिदने पुन्हा कमाल केली आणि शिबम दुबेला ( १०) पायचीत केले. राशिदने येथे घेतलेला DRS यशस्वी ठरला व भारताला ९० धावांवर चौथा धक्का बसला. शिवमने सूर्यासोबत १४ चेंडूंत २८ धावा जोडल्या.
Web Title: T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi : Virat Kohli has become the top scorer for india in T20Is with 4066 runs, going past rohit sharma's 4050, Rashid Khan take 3 crusial wicekts, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.