Join us  

W,6,W! विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला, पण वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून गेला, Video 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ आज सुपर ८ मधील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 8:44 PM

Open in App

T20 World Cup 2024 IND vs BAN Live Marathi : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ आज सुपर ८ मधील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. बांगलादेश संघाला स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी विजय मिळवणे गरजेचा आहे, तर भारत विजय मिळवून सेमी फायनलच्या उंबरठ्यावर जाऊन बसणार आहे. भारतीय संघाने Super 8 च्या पहिल्या लढतीत अफगाणिस्तानवर विजय मिळवून खात्यात २ गुण जमा केले, तर बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली आहे. बांगलादेशने आजचा सामना गमावल्यास त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवला संधी दिली गेली होती आणि रोहित शर्माने तोच संघ कायम राखला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.  बांगलादेशने फिरकीपटूंनी मारा सुरू केला आणि रोहित शर्माने त्यांचा चांगला समाचार घेतला. पण, शाकिब अल हसनने टाकलेल्या चौथ्या षटकात रोहितचा फटका चूकला आणि उत्तुंग उडालेला चेंडू जाकर अलीने टिपला. रोहित ११ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २३ धावा करून माघारी परतला. पण, विराट कोहली चांगल्या टचमध्ये दिसला आणि त्याचे फटके पाहून चाहते आनंदीत झाले. नवव्या षटकात तंझिम हसन साकिबच्या गोलंदाजीवर विराट फटका मारण्यासाठी स्टेपआऊट झाला, परंतु चेंडूने त्रिफळा उडवला. विराटने २८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह ३७ धावा केल्या.  वन डे व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मिळून ३००० हून अधिक धावा करणारा विराट हा जगातील पहिला फलंदाज ठरला. 

सूर्यकुमार यादवने पहिलाच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार खेचला, परंतु पुढच्याच चेंडूवर यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन परतला. साकिबने ३ चेंडूंत भारताला दोन मोठे धक्के दिले.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024विराट कोहलीभारत विरुद्ध बांगलादेश