Join us

IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात

IND vs BAN Warm Up Match 2024 Live Streaming : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 19:59 IST

Open in App

India vs Bangladesh Live Match Updates । न्यूयॉर्क : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषकाची तयारी होत आहे. २ जूनपासून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकाला सुरुवात होत आहे. या आधी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होत आहे. सराव सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आजच्या सामन्यात नसणार आहे. विशेष बाब म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करत आहेत.

नाणेफेकीवेळी रोहित शर्मा म्हणाला की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यामागे कोणतेही विशेष कारण नाही. प्रथमच न्यूयॉर्क येथे खेळत आहोत. त्यामुळे कोणताही विचार न करता प्रथम फलंदाजी करणे पसंत केले. येथील परिस्थिती आव्हानात्मक असून, आम्ही स्वत:ला हे आव्हान दिले आहे.  

विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. 

राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.

विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ -नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), तस्कीन अहमद, लिटन दास, सौम्य सरकार, तन्जीद हसन तमीम, शाकीब अल हसन, Tawhid Hridoy, महमुदुल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, तन्जीद हसन साकीब

राखीव खेळाडू -  अफिफ हुसैन, हसन महमुद. 

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माविराट कोहलीट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024संजू सॅमसन