पाऊस थांबला, टॉस झाला! बघा कोणी काय फैसला घेतला अन् सामना सुरू होण्याचा टाईम ठरला

गयानामध्ये पावसाचा लपंडाव सुरू होता आणि ८.५० वाजता टॉस झाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 08:52 PM2024-06-27T20:52:10+5:302024-06-27T20:52:43+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : Match to start at 9:15pm IST, England win the toss and bowl | पाऊस थांबला, टॉस झाला! बघा कोणी काय फैसला घेतला अन् सामना सुरू होण्याचा टाईम ठरला

पाऊस थांबला, टॉस झाला! बघा कोणी काय फैसला घेतला अन् सामना सुरू होण्याचा टाईम ठरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : गयानामध्ये पावसाचा लपंडाव सुरू होता... नाणेफेकीला तासभर वेळ बाकी असताना थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाला अन् टॉसला विलंब झाला होता. भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याने ICC ने २५० अतिरिक्त मिनिटं राखून ठेवली आहेत.   


ट्वेंटी-२०त भारत आणि इंग्लंड २३ वेळा समोरासमोर आले आणि त्यात भारताने १२ सामन्यांत बाजी मारली आहे. गयाना येथे पावसाचा लपंडाव सुरू असल्याने नाणेफेकीला विलंब झाला आहे. भारतीय वेळेनुसार ७.४५ वाजता पाऊस थांबल्याने मैदानावरील कव्हर्स हटवण्याचं काम सुरू झालं. येथील ड्रेनेज सिस्टम उत्तम असल्याने पाण्याचा निचरा वेगाने होताना दिसला. पण, कव्हर्स घेऊन ग्राऊंड्समन सीमारेषेपर्यंत पोहोचतात तोच पुन्हा पावसाची सुरुवात झाली. 
 


८ वाजता पाऊस थांबला आणि लख्ख प्रकाश पसरल्याने खेळाडू सरावासाठी मैदानावर आले. कव्हर्स हटवल्यानंतर अम्पायरनी खेळपट्टीची पाहणी केली आणि रोहितही त्यांच्याशी बोलताना दिसला. ८.४५ ला खेळपट्टीला पुन्हा पाहणी करण्यात आली. ८.५० ला टॉस झाला आणि ९.१५ वाजता मॅच सुरू होणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मालाही प्रथम फलंदाजी करायची होती आणि हे त्याने कबुल केले. 

भारताचा संघ - रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

Web Title: T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : Match to start at 9:15pm IST, England win the toss and bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.