Join us  

'जे लोक मला एक टक्काही...', हार्दिक पंड्याने विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन येथे २९ तारखेला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 3:38 PM

Open in App

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन येथे २९ तारखेला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने दुसऱ्यांदा T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी २००७ मध्ये टीम इंडियाने विजेतेपद पटकावले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या विजयात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हार्दिकने अंतिम सामन्यात गोलंदाजी उत्कृष्ठ केली आणि तीन षटकात २० धावा देत तीन बळी घेतले. हार्दिकने अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला १६ धावा करू दिल्या नाहीत. हार्दिकने हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर आणि कागिसो रबाडा यांची विकेट घेतली.

विराटची निवृत्तीची घोषणा झाकोळली जाऊ नये; रोहितने मैदानावर निवृत्ती का टाळली?

हार्दिक पांड्याने या वर्ल्ड कपमध्ये फलंदाजी आणि बॉलिंग या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल सीझनमध्ये हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते.  आता हार्दीकने टीकाकारांना जोरदार उत्तर दिले आहे. विजयानंतर हार्दिक पांड्याही भावूक झाला.

विजेतेपद पटकावल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, 'माझा सन्मानावर विश्वास आहे. जे लोक मला एक टक्काही ओळखत नाहीत त्यांनी इतकं सांगितलं. लोक बोलले पण काही फरक पडला नाही. मी नेहमी मानतो की शब्दांनी उत्तर देऊ नये, परिस्थिती उत्तर देते. वाईट काळ कायमचा राहत नाही. आपण जिंकलो किंवा हरलो तरी प्रतिष्ठा राखणे महत्वाचे आहे.

हार्दिक पांड्या म्हणाला, ' सर्वांना सभ्यपणे जगायला शिकावे लागेल. आपले आचरण चांगले असले पाहिजे. मला खात्री आहे की ते लोक आता आनंदी होतील. खरे सांगायचे तर मला मजा येत होती. आयुष्य बदलणाऱ्या अशा संधी फार कमी लोकांना मिळतात.

हार्दिक पांड्या म्हणाला, 'मी दडपण घेत नव्हतो आणि मला माझ्या कौशल्यावर विश्वास होता. हा क्षण आपल्या नशिबात लिहिला होता. २०२६ मध्ये भरपूर वेळ आहे. रोहित आणि विराटसाठी मी खूप आनंदी आहे. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज जे या विजयाचे पात्र होते. या फॉरमॅटमध्ये त्यांच्यासोबत खेळताना मजा आली. 

टॅग्स :हार्दिक पांड्याऑफ द फिल्डट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024