Join us  

T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी

IND vs PAK ISIS Threat : ९ तारखेला भारत आणि पाकिस्तान हा सामना होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 1:31 PM

Open in App

IND vs PAK T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी ९ जून रोजी आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्क येथे होणाऱ्या या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अशातच काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. याबद्दल काहीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी आयएसआयएस या संघटनेने ही धमकी दिल्याचे कळते. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. मात्र दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने सर्वांचीच चिंता वाढली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ISIS-K या संघटनेने हल्ल्याबद्दल भाष्य केले आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. यामध्ये हल्लेखोरांनी सामन्यादरम्यान गोंधळ घालू अशी धमकी दिली. या प्रकरणाबाबत नासाऊ काउंटीचे पोलिसांनी याला पुष्टी दिली असून, सुरक्षेबाबत सविस्तर माहिती दिली.

दरम्यान, भारतीय संघ त्यांचे सर्वाधिक सामने न्यूयॉर्क येथे खेळणार आहे. १ जून रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होणार आहे. टीम इंडिया ५ तारखेला आयर्लंडविरूद्धच्या सामन्याने आपल्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात करेल. ९ तारखेला भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित सामना खेळवला जाईल. 

विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. 

राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.

पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाबखान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024दहशतवाद