India vs Pakistan Match : पाकिस्तानी संघाला विश्वचषक जिंकून देण्यासाठी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी कंबर कसली आहे. आज ट्वेंटी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. न्यूयॉर्क येथील नासाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला, तर भारतीय संघाने आयर्लंडचा पराभव करून विजयी सलामी दिली आहे. अशातच भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक म्हणाले की, मी आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले. बऱ्यापैकी भारतीय खेळाडूंसोबत माझा चांगला अनुभव आहे. आता ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा सुरू झाली आहे. सामना न जिंकणे कधीच चांगले नसते. पाकिस्तानी संघाला प्रेरणा देण्याची गरज मला भासत नाही. होय, पण पाकिस्तानी खेळाडूंना वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवे. दोन दिवसांपूर्वी जे काही झाले ते आम्ही विसरलो आहोत. आम्ही त्यातून बाहेर पडलो आहोत.
अमेरिकेकडून पाकिस्तानचा पराभव
तसेच पाकिस्तानी संघाला मागील ट्वेंटी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेसारख्या नवख्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. याबद्दल कस्टर्न म्हणाले की, मला इतिहासात जाणे आवडत नाही, तेव्हा काय झाले याने आता काहीच फरक पडणार नाही. आमच्यामध्ये असलेली क्षमता आणि टॅलेंटच्या जोरावर आम्ही क्रिकेट खेळू. प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणण्याची क्षमता आमच्यात नक्कीच आहे. पाकिस्तानचे प्रशिक्षक 'आयसीसी'शी बोलत होते.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
पाकिस्तानचे पुढील सामने -
९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क
११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क
१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील
Web Title: t20 world cup 2024 India vs Pakistan Match We have now forgotten what happened two days ago Pakistan coach's statement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.