Join us  

जसप्रीत बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम

जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या तीन पैकी दोन सामन्यात सामनावीराचा किताब मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 3:55 PM

Open in App

Jasprit Bumrah Records, Team India T20 World Cup 2024: टी२० वर्ल्ड कप 2024 मध्ये आत्तापर्यंत भारताने तीन सामने खेळले आहेत. सध्याच्या टी२० विश्वचषकात टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि युनायटेड स्टेट्सला पराभूत करून विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. भारतीय संघ टी२० विश्वचषक 2024 मध्ये सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्यासोबतच टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्याच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत मोठा विक्रम करू शकतो. जसप्रीत बुमराह टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखे शतक ठोकण्याच्या जवळ आहे.

जसप्रीत बुमराह टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे यश मिळविण्याच्या नजीक आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून ६५ सामन्यांत ७९ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने सध्याच्या टी२० विश्वचषकात आणखी २१ विकेट्स घेतल्या, तर तो इतिहास रचेल. जसप्रीत बुमराह टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण करणारा खेळाडू ठरू शकेल. यासह जसप्रीत बुमराह टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक करणारा भारताचा पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरेल.

जर भारत टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला, तर बुमराहला एकूण ८ सामने खेळायला मिळतील. भारताला १५ जून रोजी कॅनडाविरुद्ध ग्रुप स्टेज मॅच खेळायची आहे. यानंतर टीम इंडिया सुपर-8 फेरीत ३ सामने खेळणार आहे. तो टप्पा पार केल्यास टीम इंडियाला सेमीफायनल आणि फायनल मॅच खेळण्याचीही संधी मिळेल. जसप्रीत बुमराहची वेस्ट इंडिजच्या खेळपट्ट्यांवरील कामगिरी उत्तम आहे आणि आता भारताच्या बहुतांश मॅच तेथेच खेळवल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहला हा विक्रम करण्याची नामी संधी असेल.

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

  1. युझवेंद्र चहल - ९६ विकेट्स
  2. भुवनेश्वर कुमार - ९० विकेट्स
  3. हार्दिक पांड्या - ८० विकेट्स
  4. जसप्रीत बुमराह - ७९ विकेट्स
  5. रविचंद्रन अश्विन – ७२ विकेट्स
  6. अर्शदीप सिंग - ६९ विकेट्स
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट