Netherlands vs Sri Lanka Warm-Up Match : ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीलाच नवख्या नेदरलँड्सने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधताना श्रीलंकेचा पराभव केला. सध्या विश्वचषकाचे सराव सामने खेळवले जात आहेत. नेदरलँड्सने श्रीलंकेचा २० धावांनी पराभव करून स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना घाम फुटला अन् ते संपूर्ण षटके देखील खेळू शकले नाहीत. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, जे त्यांच्या चांगलेच आंगलट आले.
बुधवारी श्रीलंका आणि नेदलँड्स यांच्यात सराव सामना खेळवला गेला. नेदरलँड्सने दिलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ केवळ १६१ धावांवर सर्वबाद झाला. त्यांनी १८.५ षटकांत सर्वबाद १६१ धावा केल्या आणि सामना २० धावांनी गमावला. अलीकडेच नवख्या अमेरिकेच्या संघाने ट्वेंटी-२० मालिकेत बांगलादेशला पराभवाची धूळ चारली.
उरलेले सराव सामने -
३० मे -नेपाळ विरूद्ध अमेरिकास्कॉटलंड विरूद्ध युगांडानेदलँड्स विरूद्ध कॅनडानामिबिया विरूद्ध पापुआ न्यू गिनीवेस्ट इंडिज विरूद्ध ऑस्ट्रेलिया
३१ मे -आयर्लंड विरूद्ध श्रीलंका स्कॉटलंड विरूद्ध अफगाणिस्तान
१ जून -बांगलादेश विरूद्ध भारत
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ