Join us  

स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली

स्पर्धेबाहेर फेकले जाण्याच्या भितीने पाकिस्तान संघाकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ओमानविरुद्ध चांगला खेळ झालेला पाहयला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 9:36 PM

Open in App

T20 World Cup 2024 PAK vs CAN Live : स्पर्धेबाहेर फेकले जाण्याच्या भितीने पाकिस्तान संघाकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ओमानविरुद्ध चांगला खेळ झालेला पाहयला मिळाला. हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी व मोहम्मद आमीर यांनी पहिल्या १० षटकांत ओमानचा निम्मा संघ माघारी पाठवला. पण, क्षेत्ररक्षणात पाकिस्तानकडून झेल सोडण्याची परंपरा याही सामन्यात कायम राहिली. सलामीवीर आरोन जॉन्सन खंबीरपणे उभा राहिला आणि अर्धशतक झळकावून पाकिस्तानसमोर सन्मानजनक आव्हान उभे केले.

सलग दोन लाजीरवाणाऱ्या पराभवामुळे पाकिस्तान सुपर ८ गटापूर्वीच बाद होण्याची शक्यता बळावली आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात अमेरिकेने पराभूत केले, तर कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध त्यांना विजयासाठीच्या १२० धावाही करता आल्या नाही. त्यामुळे त्यांना सुपर ८ ची जागा पक्की करण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती जिंकण्यासोबतच अन्य संघांवर अवलंबून रहावे लागणार आहे. पण, तेच कॅनडाने एक विजय मिळवला आहे आणि त्यांना उर्वरित दोन सामने जिंकून सुपर ८ मध्ये पोहोचता येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कडवी टक्कर अपेक्षित आहे. कलीम सना जो आता कॅनेडा संघाकडून खेळतोय, तो २०१० मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाकडून बाबर आजमसोबत खेळला होता.   

कर्णधार बाबरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि इफ्तिखर अहमदच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सईम अयुबची निवड केली गेली आहे. आरोन जॉन्सनने पहिल्या २ चेंडूंवर शाहीन आफ्रिदीला चौकार खेचले. नवनीत धलिवालनेही ( ४) मोहम्मद आमीरचे चौकाराने स्वागत केले, परंतु शेवटच्या चेंडूवर आमीरने यॉर्कवर त्रिफळा उडवला. शाहीनने कॅनडाला दुसरा धक्का देताना परगट सिंग ( २) याला माघारी पाठवले. ओमानचा स्टार फलंदाज निकोलस किर्टनला ( १) इमाद वासीमने डायरेक्ट हिटवर रन आऊट केले. हॅरिस रौफने १०व्या षटकात श्रेयस मोव्वा ( २) व रविंदरपाल सिंग ( ०) यांना बाद करून ओमानची अवस्था ५ बाद ५४ अशी केली. रौफची ही ट्वेंटी-२०तील शंभरावी विकेट ठरली.

नसीम शाहने पाकिस्तानला मोठं यश मिळवून दिले. जॉन्सन ४४ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांवर त्रिफळाचीत झाला. कॅनेडाने २० षटकांत ७ बाद १०६ धावा करून सन्मानजनक लक्ष्य उभे केले. 

 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024पाकिस्तान