३ बाद २६ धावा, पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी

नवख्या अमेरिकेच्या संघासमोर पाकिस्तानची हवा निघालेली पाहायला मिळतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 09:54 PM2024-06-06T21:54:47+5:302024-06-06T21:55:11+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 PAK vs USA Live Marathi : Babar Azam has scored the lowest score for an opener at the end of powerplay in T20WC history  | ३ बाद २६ धावा, पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी

३ बाद २६ धावा, पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 PAK vs USA Live : नवख्या अमेरिकेच्या संघासमोर पाकिस्तानची हवा निघालेली पाहायला मिळतेय... सौरभ नेत्रावळकरने दुसऱ्याच षटकात धक्का दिल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी रांग लावली आणि त्यांचे ३ फलंदाज २६ धावांवर माघारी परतले. अमेरिकन गोलंदाजांनी सुरेख मारा करताना पाकिस्तानला १० षटकांत ३ बाद ६६ धावांवर रोखले. त्यामुळे कर्णधार बाबर आजमनवर दडपण आलेले दिसले आणि त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. 

मुंबईच्या सौरभने पाकिस्तानची जीरवली, टेलरच्या अफलातून कॅचने रिझवानची विकेट मिळवली, Video

 
पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साजेशी सुरुवात करता आलेली नाही. नोस्तुश केंजिगेच्या फिरकीने अमेरिकेने डावाची सुरुवात केल्यानंतर जलदगती गोलंदाज सौरभ नेत्रावळकर ( Saurabh Nethravalkar ) दुसऱ्याच षटकात पाकिस्तानची विकेट घेतली. मोहम्मद रिझवान ९ धावांवर माघारी परतला, स्टीव्हन टेलरने स्लीपमध्ये अविश्वसनीय झेल घेतला. केंजिगेने त्याच्या पुढच्या षटकात अमेरिकेला दुसरे यश मिळवून देताना पाकिस्तानची अवस्था २ बाद १४ धावा अशी केली. फखर जमानने आल्याआल्या षटकार खेचला, परंतु कर्णधार बाबर आझमने त्याला संयमाचा सल्ला दिला. अमेरिकेकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पाचव्या षटकात बाबर रन आऊट होता होता वाचला.

 
पण, फखरने ( ११) रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात अली खानला विकेट दिली. पहिल्या ६ षटकांत पाकिस्तानला ३ बाद ३० धावा करता आल्या. यात बाबरने १४ चेंडूंत फक्त ४ धावा केल्या आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील पॉवर प्लेमधील ही सर्वात टुकार कामगिरी ठरली. याआधी तिलकरत्ने दिलशानने २०१४ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध ११ चेंडूंत १२ धावा केल्या होत्या. शिवाय पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी ८६.९१ स्ट्राईक रेटचा नकोसा विक्रमही बाबरच्या नावावर नोंदवला गेला. 

Web Title: T20 World Cup 2024 PAK vs USA Live Marathi : Babar Azam has scored the lowest score for an opener at the end of powerplay in T20WC history 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.