T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. २ जूनपासून खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात होईल. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन यांच्यासाठी ही स्पर्धा खास असेल. खरे तर हे दोघे आतापर्यंतच्या सर्व ट्वेंटी-२० विश्वचषकात दिसले आहेत. यावेळी देखील ते मोठ्या व्यासपीठावर खेळत आहेत. रोहित आणि शाकिब हे २००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०२१ आणि २०२२ या सर्व विश्वचषकात खेळले आहेत.
ट्वेंटी-२० विश्वचषकाचे सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा (३९) अव्वल आहे, तर शाकिब अल हसन (३६) तिलकरत्ने दिलशान (३५), ड्वेन ब्राव्हो, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक आणि डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी ३४-३४ सामने खेळले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत हिटॅमन रोहित ९६३ धावांसह चौथ्या स्थानावर आहे, तर सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत शाकिब अल हसन ४७ बळींसह पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, या विश्वचषकात चमकदार कामगिरी करून इतिहास रचण्याची संधी रोहित शर्माकडे आहे.
ट्वेंटी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू -विराट कोहली, भारत - ११४१ धावामहेला जयवर्धने, श्रीलंका - १०१६ धावाख्रिस गेल, वेस्ट इंडिज - ९६५ धावारोहित शर्मा, भारत - ९६३ धावातिलकरत्ने दिलशान, श्रीलंका - ८९७ धावा
सर्वाधिक बळी घेणारे शिलेदार -शाकिब अल हसन, बांगलादेश - ४७ बळीशाहिद आफ्रिदी, पाकिस्तान - ३९ बळीलसिथ मलिंगा, श्रीलंका - ३८ बळीसईद अजमल, पाकिस्तान - ३६ बळीअंजथा मेंडिस आणि उमर गुल - ३५ बळी
सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू -ख्रिस गेल, वेस्ट इंडिज - ६३ रोहित शर्मा, भारत - ३५ जोस बटलर, युवराज सिंग - ३३ शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर - ३१