मुलगी खांद्यावर, देश पाठीशी आणि बाजूला भाऊ; Rohit Sharma च्या आईची भावनिक पोस्ट

Rohit Sharma's mother's Instagram post : भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:26 PM2024-07-01T14:26:06+5:302024-07-01T14:34:24+5:30

whatsapp join usJoin us
t20 world cup 2024 Rohit Sharma's mother Purnima Sharma has made an emotional post | मुलगी खांद्यावर, देश पाठीशी आणि बाजूला भाऊ; Rohit Sharma च्या आईची भावनिक पोस्ट

मुलगी खांद्यावर, देश पाठीशी आणि बाजूला भाऊ; Rohit Sharma च्या आईची भावनिक पोस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Latest News : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब जिंकला. २०१३ पासून भारताला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नव्हती. पण, टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १२ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. भारताने सामना जिंकताच कर्णधार रोहित शर्मासह सर्वच खेळाडू भावुक दिसले. आता रोहितची आई पूर्णिमा शर्मा यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. 

रोहितच्या आईने शेअर केलेल्या फोटोमध्ये रोहित, विराट आणि त्यांची नात अर्थात रोहितची मुलगी समायरा पाहायला मिळत आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये म्हटले आहे की, मुलगी खांद्यावर... संपूर्ण देश पाठीशी... आणि भाऊ बाजूला आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकताच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. अष्टपैलू रवींद्र जडेजाही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त झाला. 

दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचं दुःख अखेर त्याच्या मनातून दूर झाले असावे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला. भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला. 

Web Title: t20 world cup 2024 Rohit Sharma's mother Purnima Sharma has made an emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.