Join us  

३ धावांवर ३ विकेट्स! Quinton de Kock 'डायमंड डक' ठरला, आफ्रिकेचा डाव गडगडला, Video 

T20 World Cup 2024 SA vs NED Live : नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ नेहमीच मानसिक दडपणात दिसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 10:06 PM

Open in App

T20 World Cup 2024 SA vs NED Live : नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ नेहमीच मानसिक दडपणात दिसला आहे. यापूर्वी मागील दोन वर्ल्ड कप स्पर्धेत ऑरेंज आर्मीने आफ्रिकेला पराभूत केले होते, परंतु आजच्या सामन्यात आफ्रिका सहज बाजी मारेल असे वाटले होते. पण, ते मानसिक दडपण ते झुगारू शकले नाहीत. क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) डायमंड डकवर परतला आणि पाठोपाठ दोन विकेट्स पडल्या. १०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३ धावा अशी दयनीय झाली.

दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सेन ( २-२०), एनरिच नॉर्खिया ( २-१९), ऑथनेल बार्टमन ( ४-११) यांच्यासह   सर्वच गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. क्षेत्ररक्षणात आफ्रिकन खेळाडूंच्या कामगिरीला तोड नाही, हे वेगळं सांगायला नको. अप्रतिम झेल, भन्नाट रन आऊट अन् चपळ क्षेत्ररक्षण याही सामन्यात त्यांच्याकडून पाहायला मिळाले. सेब्रँड इगलब्रेच ( ४०) आणि लॉगन व्हॅन बीक ( २३) यांनी सातव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करून संघाला शतकी पार नेले. बार्टमनने २०व्या षटकात ३ विकेट्स घेऊन नेदरलँड्सला ९ बाद १०३ धावांपर्यंत रोखले.  

आफ्रिकेची सुरुवात अनपेक्षित झाली, कारण क्विंटन डी कॉक पहिल्याच चेंडूवर रन आऊट होऊन माघारी परतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत डायमंड डकवर बाद होणारा क्विंटन डी कॉक तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी चमारी अटापट्टू ( वि. भारत, २०१०) आणि तिलकरत्ने दिलशान ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१२) हे एकही चेंडू न खेळता रन आऊट झाले होते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ( पुरुष व महिला) एकाद्या संघाची रन आऊटने सुरुवात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लॉगन व्हॅन बीकच्या अप्रतिम चेंडूवर रिझा हेंड्रिक्स ( ३) त्रिफळाचीत झाला. हेंड्रिक्स स्तब्ध उभा राहिला. तिसऱ्या षटकात एडन मार्करम भोपळ्यावर बाद झाल्याने आफ्रिकेला ३ धावांवर ३ धक्के बसले.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024द. आफ्रिकाक्विन्टन डि कॉक