भारत-पाकिस्तान T20 World Cup सामन्याची तारीख ठरली? असं असेल टीम इंडियाचं वेळापत्रक

विश्वचषक स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना नेहमीच रंगतदार असतो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:54 AM2024-01-04T11:54:52+5:302024-01-04T11:55:44+5:30

whatsapp join usJoin us
t20 world cup 2024 schedule india vs pakistan june 9 in new york final likely in barbados | भारत-पाकिस्तान T20 World Cup सामन्याची तारीख ठरली? असं असेल टीम इंडियाचं वेळापत्रक

भारत-पाकिस्तान T20 World Cup सामन्याची तारीख ठरली? असं असेल टीम इंडियाचं वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan Time table, T20 World Cup 2024: वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारताला फायनलमध्ये पराभूत व्हावे लागले. पण 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघालाआयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. यावर्षी आयसीसी टी20 विश्वचषक 2024 जूनमध्ये खेळवला जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण सूत्रांच्या हवाल्याने भारतीय संघाचे वेळापत्रक कसे असेल याची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

टी20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. संघाचा तिसरा सामना १२ जूनला अमेरिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. हे तीन सामने न्यूयॉर्कमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. मात्र, विश्वचषकाचे वेळापत्रक शेवटच्या क्षणी काही अंशी बदलले जाऊ शकते असेही बोलले जात आहे.

असे असू शकते भारतीय संघाचे वेळापत्रक:-

  • ५ जून – वि आयर्लंड, न्यूयॉर्क
  • ९ जून - वि.पाकिस्तान, न्यूयॉर्क
  • १२ जून - वि. अमेरिका, न्यूयॉर्क
  • १५ जून - वि.एस. कॅनडा, फ्लोरिडा
  • २० जून – विरुद्ध C-1 (न्यूझीलंड) बार्बाडोस
  • २२ जून – श्रीलंका, अँटिग्वा वि
  • २४ जून – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेंट लुसिया
     

बाद फेरीचे सामने

  • २६ जून - पहिली उपांत्य फेरी, गयाना
  • २८ जून – दुसरी उपांत्य फेरी, त्रिनिदाद
  • २९ जून - अंतिम, बार्बाडोस

Web Title: t20 world cup 2024 schedule india vs pakistan june 9 in new york final likely in barbados

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.