T20 World Cup 2024 Semi Final Ind vs Eng: टीम इंडियाचा आज इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीचा सामना आहे. हा सामना जिंकण्यासाठी संतुलित प्लेइंग इलेव्हन असणे खूप आवश्यक आहे. आतापर्यंत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. पण गयानाचे हवामान आणि येथील खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आजच्या सामन्यात भारताला विजय मिळवण्यासाठी तीन खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीची आवश्यकता आहे. जाणून घेऊया ते ३ खेळाडू कोण...
सुपर-8 पासून टीम इंडियाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. गयानामधील परिस्थिती, हवामान आणि खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता संघात बदल होण्याची शक्यता सध्या तरी गरजेची वाट नाही. अशा वेळी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन बदलणार नाही असे बोलले जात आहे. अशा वेळी गयानामध्ये ३ खेळाडू खूप महत्त्वाचे ठरणार आहे. ते म्हणजे डावखुरे फिरकीपटू कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजा.
टीम इंडिया गयानाच्या मैदानावर ३ फिरकीपटू आणि २ वेगवान गोलंदाजांसह उतरेल हे जवळपास निश्चित आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला गयानामध्ये इंग्लंड विरुद्धची सेमीफायनल जिंकणे आवश्यक आहे. यासाठी तिन्ही फिरकीपटूंची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. गयानाच्या खेळपट्टीवर फिरकी हे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. कारण गेल्या ५ सामन्यात फिरकीपटूंनी या मैदानावर २७ बळी घेतले आहेत. अशा या स्थितीत कुलदीप, अक्षर आणि जाडेजा हे त्रिकुट इंग्लंडविरुद्ध भारताला विजय मिळवून देण्यात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.