भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये वापरला जाणार ICCचा २५० मिनिटांचा नियम, जाणून घ्या सविस्तर

T20 World Cup 2024 Semi Final IND vs ENG: सेमीफायनलसाठी आयसीसीने एक विशेष नियम केला आहे. हा २५० मिनिटांचा नियम असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 05:21 PM2024-06-27T17:21:57+5:302024-06-27T17:24:04+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 Semi Final IND vs ENG Team India vs England 250 minute rule Guyana weather | भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये वापरला जाणार ICCचा २५० मिनिटांचा नियम, जाणून घ्या सविस्तर

भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये वापरला जाणार ICCचा २५० मिनिटांचा नियम, जाणून घ्या सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 Semi Final IND vs ENG: टी२० वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. गयानामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हा सामना वेळेत पार पडेल की नाही याबद्दल भीती व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत दुसऱ्या सेमीफायनलसाठी आयसीसीने एक विशेष नियम केला आहे. हा २५० मिनिटांचा नियम असणार आहे. या नियमानुसार, मॅच खेळण्यासाठी सामान्य वेळेच्या तुलनेत बराच वेळ वाट पाहता येणार आहे. जाणून घेऊया या नियमाबद्दल...

२५० मिनिटांचा नियम काय?

आयसीसीने भारत-इंग्लंड उपांत्य फेरीसाठी कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही, परंतु त्यासाठी 250 मिनिटांचा नियम बनवला आहे. त्या अंतर्गत, नियोजित वेळेपासून पुढील ३ तास सामना सुरू झाला नाही, तर त्यानंतर २५० मिनिटांचा नियम लागू होईल. याचा अर्थ, यानंतर पुढील २५० मिनिटांत म्हणजे ४ तास १० मिनिटांमध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. भारतीय वेळेनुसार, सामना सुरू करण्याची शेवटची वेळ ही रात्री १ वाजून ४४ मिनिटे ही असेल. जर हा सामना त्यानंतरही सुरू झाला नाही, तर सामना रद्द केला जाईल आणि टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचेल. कारण टीम इंडिया सुपर 8 च्या क्रमवारीत अव्वल स्थानी होती.

गयाना मध्ये हवामान कसे आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, सामन्या दरम्यान गयानामध्ये ढगाळ वातावरण असेल. पावसाची शक्यता ९० टक्के आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे गेल्या २४ तासात गयानामधील हवामान खूप बदलले आहे. गयानामध्ये गेल्या काही तासांपासून पाऊस नाही. मात्र, पाऊस पडला तरी सामना सुरू करण्याची व्यवस्था उत्तम आहे. गयानाच्या मैदानी भागातील ड्रेनेज व्यवस्था अतिशय उत्कृष्ट आहे. गयानामध्ये गेले ३ दिवस पाऊस पडत होता, मात्र असे असतानाही मैदान कोरडे असल्याने टीम इंडियाने बुधवारी सराव केला. हवामानाचे सहकार्य राहिल्यास क्रिकेट चाहत्यांना भारत आणि इंग्लंड सामना नक्कीच पाहता येईल.

Web Title: T20 World Cup 2024 Semi Final IND vs ENG Team India vs England 250 minute rule Guyana weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.