ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 

आयसीसीने ठरवलेल्या सिडींगनुसार ऑस्ट्रेलिया व भारत यांना ग्रुप १ मध्ये स्थान दिले गेले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 05:53 PM2024-06-13T17:53:51+5:302024-06-13T17:55:29+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 Super 8 Scenario- Four teams have ensured progression to the Super 8 of the T20 World Cup, leaving the rest to fight for the remaining four spots, Australia and India have been both slotted into Group 1  | ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 

ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 Super 8 Scenario - अमेरिका व वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ साठी चार संघ निश्चित झाले आहेत. आता उर्वरित ४ संघांसाठी टफ फाईट पाहायला मिळणार आहे.  


सुपर ८ साठी आतापर्यंत पात्र ठरलेले संघ
भारत
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडिज 

आयसीसीने ठरवलेल्या सिडींगनुसार ऑस्ट्रेलिया व भारत यांना ग्रुप १ मध्ये स्थान दिले गेले आहे आणि २४ जूनला हे संघ समोरासमोर येणार आहेत. तेच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ग्रुप २ मध्ये जागा दिली गेली आहे. 

अ गटातून भारताने सुपर ८ मधील जागा पक्की केली आहे आणि आता दुसऱ्या स्थानासाठी यजमान अमेरिका ४ गुणांसह आघाडीवर आहे. पाकिस्तान ( २) व कॅनडा ( २) यांनाही संधी आहे. पण, या दोन्ही संघांच्या शेवटच्या साखळी सामन्यावर पावसाचे सावट आहे. अमेरिकेच्या लढतीतही पावसाची शक्यता आहे आणि हा सामना रद्द झाला तर अमेरिका ५ गुणांसह अ गटातून सुपर ८ साठी पात्र ठरेल.


ब गटातून ऑस्ट्रेलियाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. स्कॉटलंड सध्या ५ गुणांसह आघाडीवर आहे. गतविजेत्या इंग्लंडला संधी आहे आणि उर्वरित दोन सामने जिंकून तेही ५ गुणांसह कूच करतील. पण, त्याचवेळी त्यांना ऑस्ट्रेलियाकडून स्कॉटलंडचा पराभव आवश्यक आहे आणि मग नेट रन रेटवर सर्व गणित अवलंबून असेल.


यजमान वेस्ट इंडिजने क गटातून आगेकूच केली आहे आणि या गटात अफगाणिस्तान २ सामन्यांत ४ गुणांसह दुसरे स्थान पटकावण्यासाठी तयार आहे. त्यांना एक विजय पुरेसा आहे. पण, न्यूझीलंड व युगांडा यांनी अजून हार मानलेली नाही.  त्यांना उर्वरित सामने जिंकून प्रत्येकी ४ गुण करता येतील. पण, त्यासाठी अफगाणिस्तानचा दोन्ही सामन्यांत पराभव व्हावा अशी प्रार्थना किवी व युगांडाला करावी लागेल.


दक्षिण आफ्रिकेने ड गटातून सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे. या गटात बांगलादेश व नेदरलँड्स यांच्यात टफ फाईट आहे. दोन्ही संघ दोन सामन्यांत प्रत्येकी २ गुणांसह शर्यतीत आहेत. आज बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामना आहे आणि यातील विजेता हे चित्र स्पष्ट करेल. 

Web Title: T20 World Cup 2024 Super 8 Scenario- Four teams have ensured progression to the Super 8 of the T20 World Cup, leaving the rest to fight for the remaining four spots, Australia and India have been both slotted into Group 1 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.