T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील Super 8 गटाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. इंग्लंडने उशारीने पुनरागमन करताना आणि ऑस्ट्रेलियाच्या कृपेने शेवटच्या क्षणाला सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले. पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आदी तगडे संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले, तर अमेरिका हा नवखा संघ सुपर ८ मध्ये तगड्या संघांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताच्या ग्रुप १ मधील चौथा स्पर्धक आज निश्चित झाल्याने सुपर ८ गटाचं संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे.
बांगलादेशने सोमवारी नेपाळवर २१ धावांनी विजय मिळवुन सुपर ८ गटातील आपले स्थान पक्के केले. बांगलादेशच्या १०६ धावांच्या प्रत्युत्तरात नेपाळला ८५ धावाच करता आल्या. बांगलादेश ग्रुप १ मध्ये आता भारत, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना करणार आहे, तर ग्रुप २ मध्ये अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. सुपर ८ मध्ये प्रत्येक संघ ३ सामने खेळतील आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
१९ जून रोजी अँटिग्वामध्ये अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीने सुपर ८ चा टप्पा सुरू होईल. त्याच दिवशी संध्याकाळी सेंट लुसियामध्ये वेस्ट इंडिजचा सामना इंग्लंडशी होईल. पुढील दिवशी बार्बाडोसमध्ये अपराजित भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने होतील. भारत कॅरिबियनमध्ये प्रथमच या स्पर्धेतील सामना खेळणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हे संघ २२ जून रोजी सेंट व्हिन्सेंट येथे समोरासमोर येतील तेव्हा गेल्या वर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलच्या आठवणी ताज्या होतील. पण, या लढतीत टीम इंडिया त्याची व्याजासह वसूली करेल, अशी चाहत्यांना इच्छा आहे.
सुपर ८ चे वेळापत्रक १९ जून: अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा१९ जून: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया२० जून: अफगाणिस्तान विरुद्ध भारत, ब्रिजटाउन, बार्बाडोस२० जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, अँटिग्वा२१ जून: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रोस आइलेट, सेंट लुसिया२१ जून: अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिजटाउन, बार्बाडोस२२ जून: भारत विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, अँटिग्वा२२ जून: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट२३ जून: अमेरिका विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, बार्बाडोस२३ जून: वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा२४ जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया२४ जून: अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट