America vs Pakistan Match Updates : आज ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात सामना होत आहे. या सामन्यातून बाबर आझमचा संघ चालू स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला यजमान अमेरिकेच्या कर्णधाराने शेजाऱ्यांना इशारा दिला आहे. अमेरिकेचा कर्णधार मोनंक पटेलने पाकिस्तानला आव्हान देत म्हटले की, जर त्यांचे खेळाडू ३०-४० मिनिटे मैदानावर टिकून राहिले तर सामना त्यांच्या बाजूने फिरवू शकतात. खरे तर मोनंक पटेल हा मूळचा भारतातील गुजरात येथील आहे.
दरम्यान, या स्पर्धेत अमेरिकेने पहिला सामना कॅनडाविरुद्ध खेळला. २ जून रोजी डल्लास येथे झालेल्या सामन्यात विजय मिळवून अमेरिकेने विजयी सलामी दिली. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने २० षटकांत ५ गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेने १७.४ षटकांत तीन गडी गमावून १९७ धावा केल्या आणि सामना सात गडी राखून जिंकला. अमेरिकन संघ प्रथमच या स्पर्धेत खेळत आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर कर्णधार मोनंक पटेलचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
अमेरिकेसमोर पाकिस्तानचे आव्हान अमेरिकेचा कर्णधार मोनंक पटेल म्हणाला की, एकदा आम्ही पाकिस्तानविरुद्ध ३०-४० मिनिटे मैदानावर टिकून राहिलो की आम्ही हा सामना नक्कीच जिंकू शकतो. अमेरिकन कर्णधार मोनंक पटेल कॅनडाविरुद्धच्या सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नाही. सलामीच्या सामन्यात त्याने १६ चेंडूत १६ धावांची खेळी केली. त्याचवेळी आरोन जोन्सने स्फोटक खेळी केली आणि सामना एकतर्फी केला.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -६ जून - पाकिस्तान विरूद्ध अमेरिका, डल्लास९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील