T20 World Cup 2024 Warm-Up Match : २ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकाआधी भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध सराव सामना खेळणार आहे. आयसीसीने सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून पाकिस्तानचा एकही सामना होणार नाही. शेजारील देश थेट भारताविरूद्ध ९ तारखेला सामना खेळेल. विश्वचषकाआधी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ट्वेंटी-२० मालिका होत असल्याने हे संघ सराव सामने खेळणार नाहीत. २७ मे पासून सराव सामने खेळवले जातील. यातील सलामीचा सामना कॅनडा आणि नेपाळ यांच्यात होईल. भारतीय संघ अमेरिकेत १ जून रोजी बांगलादेशविरूद्ध सराव सामना खेळेल.
पाकिस्तानी संघ मायदेशात ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडविरूद्ध चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिकाच दोन्हीही संघांसाठी विश्वचषकाची तयारी असेल यात शंका नाही. २२ मे ते ३० तारखेदरम्यान पाकिस्तान-इंग्लंड मालिका पार पडेल, तर २७ ते १ जूनदरम्यान विश्वचषकाचे सराव सामने खेळवले जातील. द्विपक्षीय मालिकेमुळे पाकिस्तान आणि इंग्लंड यांना एकही सराव सामना खेळता येणार नाही.
ट्वेंटी-२० विश्वचषकातील सराव सामने -२७ मे -कॅनडा विरूद्ध नेपाळ ओमान विरूद्ध पापुआ न्यूगिनी नामिबिया विरूद्ध युंगाडा
२८ मे -श्रीलंका विरूद्ध नेदरलँड्स बांगलादेश विरूद्ध अमेरिका ऑस्ट्रेलिया विरूद्ध नामिबिया
२९ मे -दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंट्रा-स्क्वाडअफगाणिस्तान विरूद्ध ओमान ३० मे -नेपाळ विरूद्ध अमेरिकास्कॉटलंड विरूद्ध युगांडानेदलँड्स विरूद्ध कॅनडानामिबिया विरूद्ध पापुआ न्यू गिनीवेस्ट इंडिज विरूद्ध ऑस्ट्रेलिया
३१ मे -आयर्लंड विरूद्ध श्रीलंका स्कॉटलंड विरूद्ध अफगाणिस्तान
१ जून -बांगलादेश विरूद्ध भारत
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ