Join us  

WI vs ENG : वेस्ट इंडिजच्या पराभवासाठी पोलार्डने रणनीती आखली; इंग्लंडच्या विजयासाठी झटला

WI vs ENG T20 World Cup 2024 Super-8 : वेस्ट इंडिजचा पराभव करून इंग्लंडने सुपर-८ च्या दुसऱ्या सामन्यात विजय साकारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:02 AM

Open in App

Kieron Pollard News : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये सुपर-८ च्या दुसऱ्या लढतीत गतविजेत्या इंग्लंडने यजमान वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू किरॉन पोलार्ड आपल्याच संघाच्या पराभवासाठी रणनीती आखताना दिसला. विश्वचषकात इंग्लंडच्या विजयासाठी तो झटत आहे. पोलार्ड सहकारी प्रशिक्षक म्हणून इंग्लिश संघासोबत कार्यरत आहे. ३७ वर्षीय पोलार्ड इंग्लिश संघाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. विडिंजचा दारूण पराभव करून इंग्लंडने सुपर-८ मध्ये विजयाचे खाते उघडले. 

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील बहुचर्चित सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. विडिंजने १८१ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना गतविजेत्यांनी सहज विजय मिळवला. इंग्लंडकडून फिल सॉल्टने ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ८७ धावांची नाबाद खेळी केली आणि इंग्लिश संघाने ८ गडी आणि १५ चेंडू राखून विजय मिळवला. जोस बटलरच्या संघाने १७.३ षटकांत २ बाद १८१ धावा करून सहज विजय मिळवला. फिल सॉल्टशिवाय जॉनी बेयरस्टोने चांगली खेळी केली, त्याने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने २६ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. यजमानांकडून आंद्रे रसेल (१) आणि रोस्टन चेस (१) वगळता एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. 

दरम्यान, डिसेंबर २०२३ मध्ये मॅथ्यू मॉटचा कार्यकाळ संपल्यानंतर पोलार्डने इंग्लंड बोर्डाने आपल्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवले. पोलार्डच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होत असलेला ट्वेंटी-२० विश्वचषक खेळत आहे. पोलार्डच्या मायदेशात होत असलेल्या विश्वचषकामुळे त्याला तेथील मैदानांचा अंदाज आहे. पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०१ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये कॅरेबियन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१२ मध्ये संघाच्या ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि २०२१ च्या आवृत्तीत तो कर्णधार म्हणून खेळला. २०२२ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, पोलार्ड जगभरातील अनेक ट्वेंटी-२० फ्रँचायझी लीगमध्ये सक्रिय आहे आणि वेगवेगळ्या भूमिका बजावतो. 

टॅग्स :किरॉन पोलार्डट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024वेस्ट इंडिजइंग्लंड