WI vs NZ Live Match Updates : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या २६ व्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ भिडले. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात यजमान संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना न्यूझीलंडने शानदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजने युगांडाला पराभूत करून सुपर-८ च्या दिशेने एक पाऊल टाकले, तर किवी संघाला अफगाणिस्तानने पराभूत करून क्रिकेट विश्वाला धक्का दिला होता. त्यामुळे आजचा सामना दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. किवी संघाच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत यजमान विडिंजला १४९ धावांत रोखले.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून शेरफेन रदरफोर्ड वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. याव्यतिरिक्त ब्रँडन किंग (९), जॉन्सन चार्ल्स (०), निकोलस पूरन (१७), रोस्टन चेस (०), रोवमन पॉवेल (१), अकिल हुसैन (१५), आंद्रे रसेल (१४), रोमारियो शेफर्ड (१३) आणि अल्झारी जोसेफने (६) धावा केल्या. अखेर यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १४९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर टीम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. याशिवाय जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांनी १-१ बळी घेतला.
न्यूझीलंडचा संघ -केन विल्यमसन (कर्णधार), फिन ॲलन, डेव्होन कॉन्वे, डेरिल मिशेल, ग्लेम फिलिप्स, रचिन रवींद्र, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट.
वेस्ट इंडिजचा संघ - रोवमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमारियो शेफर्ड, अकिल हुसैन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती.