Join us

WI vs Uganda : 39 ALL OUT! 'अकेला' हुसैन! नवख्या संघाला स्वस्तात गुंडाळलं; विडिंजचा मोठा विजय 

T20 World Cup 2024 WI vs Uganda : यजमान वेस्ट इंडिजने युगांडाचा दारूण पराभव करून दुसरा विजय मिळवला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 08:49 IST

Open in App

WI vs Uganda Live Match Updates : पापुआ न्यू गिनीचा पराभव करून विश्वचषकात आपल्या विजयाचे खाते उघडणाऱ्या युगांडाला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिज आणि युगांडा यांच्यात झालेल्या सामन्यात यजमानांनी मोठा विजय मिळवला. सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. वेस्ट इंडिजने पापुआ न्यू गिनीचा पराभव करून विजयी सलामी दिली होती. वेस्ट इंडिजने दिलेल्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ अवघ्या ३९ धावांत गारद झाला आणि विडिंजने १३४ धावांनी मोठा विजय साकारला. अकिल हुसैनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर यजमानांनी सलग दुसरा विजय मिळवला. 

दरम्यान, युगांडाच्या एकाही फलंदाजाला १० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. यजमान संघाकडून अकिल हुसैनने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर आंद्रे रसेल, रोमरियो शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. तर अल्झारी जोसेफला (२) बळी घेण्यात यश आले. 

 तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित २० षटकांत ५ बाद १७३ धावा केल्या. सुरुवातीला विंडिजचा संघ संघर्ष करताना दिसला. मग सांघिक खेळीच्या जोरावर त्यांना सन्मानजक धावसंख्या उभारण्यात यश आले. यजमान संघाकडून ब्रँडन किंग (१३), जॉन्सन चार्ल्स (४४), निकोलस पूरन (२२), रोवमन पॉवेल (२३), शेरफन रूदरफोर्ड (२२), आंद्रे रसेल (नाबाद ३० धावा) आणि रोमारियो शेफर्डने नाबाद ५ धावा केल्या. युगांडाकडून कर्णधार ब्रायन मसाबाने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर दिनेश नकरानी, अल्पेश रामजानी आणि कॉसमस क्युवटा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतले. 

वेस्ट इंडिजचा संघ -रोवमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमरियो शेफर्ड, अकिल हुसैन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती. 

युगांडाचा संघ -ब्रायन मसाबा (कर्णधार), रोजर मुकासा, सायमन सेसाजी, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह, अल्पेश रामजानी, दिनेश नकरानी, जुमा मियागी, केनेथ वैसवा, कॉसमस क्युवटा, फ्रँक न्सुबुगा. 

टॅग्स :वेस्ट इंडिजट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आयसीसी