Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे १ जूनपासून टी२० विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) रंगणार आहे. या स्पर्धेसाठी काही बलाढ्य तर काही नवखे एकूण २० संघ पात्र ठरले आहेत. ५-५ संघांच्या ४ गटात गटनिहाय लढत रंगणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात रंगणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना ९ जूनला होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Team India) नुकतीच घोषणा करण्यात आली. रोहित संघाच्या नेतृत्वाखालील या संघात हार्दिक पांड्याला उपकर्णधार करण्यात आले आहे. संघात फिरकीपटू म्हणून रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या चौघांना संधी दिली आहे. गेल्या टी२० विश्वचषकात युजवेंद्र चहलला संधी मिळाली नव्हती. पण यंदा संधी मिळाल्याने उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरात त्याची पत्नी धनश्री वर्माने केलेल्या गोष्टीने सध्या चर्चा रंगली आहे.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघेही नेहमीच एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. यंदाच्या टी२० विश्वचषकासाठी संघात युझवेंद्र चहललाही स्थान मिळाले. त्यानंतर धनश्रीने तिच्या पतीला सपोर्ट करणारी एक पोस्ट स्टोरीवर शेअर केली. तिने इन्स्टाग्रामवर पतीसाठी एक खास स्टोरी शेअर केली. गेल्या टी२० विश्वचषकात वगळण्यात आलेल्या आपल्या पतीला यंदा संधी मिळाल्याने धनश्री वर्मा चांगलीच खूश झाली. तिने हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले- 'तो परत आलाय'
दरम्यान, चहल हा IPL मध्ये २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ८० टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९६ बळी घेतले आहेत.
रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
- विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ-
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट-
- अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
- ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
- क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
- ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
Web Title: T20 World Cup 2024 Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma shares special Instagram Story after BCCI declares Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.