T20 World Cup, AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन संघाला सामन्यापूर्वी मिळाली दुःखद वार्ता, दोन दिग्गजांचं झालं निधन; मैदानावर खेळाडू दिसले दडपणात 

T20 World Cup, AUSTRALIA V ENGLAND : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्या सामन्याची उत्सुकता होती ती इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीची.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 08:03 PM2021-10-30T20:03:43+5:302021-10-30T20:04:38+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, AUS vs ENG : Australian players wear Black armbands to honour the lives of Ashley Mallett and Alan Davidson, Australia struggling - 21/4 | T20 World Cup, AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन संघाला सामन्यापूर्वी मिळाली दुःखद वार्ता, दोन दिग्गजांचं झालं निधन; मैदानावर खेळाडू दिसले दडपणात 

T20 World Cup, AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन संघाला सामन्यापूर्वी मिळाली दुःखद वार्ता, दोन दिग्गजांचं झालं निधन; मैदानावर खेळाडू दिसले दडपणात 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, AUSTRALIA V ENGLAND : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्या सामन्याची उत्सुकता होती ती इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीची. इंग्लंडनं नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिलं. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला दुःखद वार्ता मिळाली. ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज खेळाडू अ‍ॅश्ली मॅलेट आणि अ‍ॅलेन डेव्हिडसन ( Ashley Mallett and Alan Davidson) यांचे निधन झाले. त्यांना श्रंद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दंडावर काळी फित बांधली होती. हे दुःख असताना मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही निराशाजन झाली. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस  व ग्लेन मॅक्सवेल हे चार खेळाडू २१ धावांवर माघारी परतले.


ऑस्ट्रेलियाचे महान अष्टपैलू खेळाडू अ‍ॅलन डेव्हिडसन यांचे ९२व्या वर्षी, तर माजी फिरकीपटू अ‍ॅश्ली मॅलेट यांचे ७६व्या वर्षी निधन झाले. मॅलेट बरीच वर्ष कॅन्सरशी झगडत होते. डेव्हिडसन यांनी १९५३ ते ६३ या कालावधीत ४४ कसोटी सामने खेळले आणि पाकिस्तानचा वसीम अक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी डेव्हिडसन हे जगातील सर्वोत्तम डावखुरे जलदगती गोलंदाज होते. त्यांनी १८६ विकेट्स घेतल्या आहेत आणि १३२८ धावाही केल्या आहेत. डेव्हिडसन हे स्लिपवमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होते. १९६०मध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टाय झालेल्या सामन्यात डेव्हिडसन यांनी बोट तुटूनही खेळ केला होता. त्यांनी त्या सान्यात ११ विकेट्स घेतल्या होत्या आणि १२४ धावाही केल्या होत्या. चौथ्या डावात त्यांनी ८० धावांची खेळी करताना संघाला ५ बाद ५२ वरून २३२ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. एकाच सामन्यात १० विकेट्स व १०० धावा करणारे ते पहिलेच खेळाडू होते.

मॅलेट यांनी १९६८मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. त्यांनी ३८ कसोटींत १३२ विकेट्स घेतल्या. १९८०मध्ये त्यांनी अखेरची कसोटी खेळली होती. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ऑफ स्पिनर्समध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नॅथन लियॉन ( ३९९) आणि ह्यू ट्रंबल ( १४१) हे अव्वल दोन क्रमांकावर आहेत. १९६९-७०मध्ये बिल लॉरी यांच्या नेतृत्वाखालील ऑसी संघांनं भारतावर ३-१ असा विजय मिळवला होता आणि त्या मालिकेत मॅलेट यांची महत्त्वाची भूमिका होती त्यांनी २८ विकेट्स घेतल्या होत्या.  

Web Title: T20 World Cup, AUS vs ENG : Australian players wear Black armbands to honour the lives of Ashley Mallett and Alan Davidson, Australia struggling - 21/4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.