Join us  

T20 World Cup, AUS vs NZ Live : Steve Smith ला ऑस्ट्रेलियाच्या संघात नाही स्थान; रोहित, विराटला टक्कर देणाऱ्या  फलंदाजाला किवींनी बाकावर बसवले

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : पहिल्या फेरीतून वेस्ट इंडिज सारख्या माजी विश्वविजेत्या संघाला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर आयर्लंड, झिम्बाब्वे, नेदरलँड्स व श्रीलंका हे संघ सुपर १२ मध्ये पोहोचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:15 PM

Open in App

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : पहिल्या फेरीतून वेस्ट इंडिज सारख्या माजी विश्वविजेत्या संघाला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर आयर्लंड, झिम्बाब्वे, नेदरलँड्स व श्रीलंका हे संघ सुपर १२ मध्ये पोहोचले आहेत. आजपासून सुपर १२ च्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होतेय आणि यजमान ऑस्ट्रेलियासमोर शेजारी न्यूझीलंडचे आव्हान आहे. पण, २०११पासून क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे अ‍ॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील संघाचे पारडे जड आहे. सराव सामन्यांत दोन्ही संघांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

  • मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एल्बोला झालेल्या दुखापतीमुळे केन विलियम्सनचा फॉर्म हरवलेला दिसतोय. नोव्हेंबर २०२१नंतर केनला ट्वेंटी-२०त क्रिकेटमध्ये २० सामन्यांत १०५.२६च्या स्ट्राईक रेटने ४२० धावा करता आल्या आहेत.
  • मॅथ्यू वेडचं वादळ रोखण्यासाठी ट्रेंट बोल्ट हा हुकमी एक्का ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २३ चेंडूत ३ वेळा वेडला बाद केले आहे.
  • मागील वर्षभरात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जलदगती गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ( २३) आघाडीवर आहे. त्याने ३२ डावांत ६.२०च्या इकॉनॉमीने २३ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेच्या महिषा थिक्सानाने ४० डावांत २४ विकेट्स घेतल्या आहेत. 

 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे  ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला जागा मिळालेली नाही, तर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रोहित व विराटला चॅलेंज देणारा फलंदाज मार्टीन गुप्तील याला किवींनी बाकावर बसवले आहे. 

न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, फिन अ‍ॅलन, केन विलियम्सन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅम्पमन, जिमी निशॅम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, इश सोढी, ल्युकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट ( NewZealand (Playing XI): Devon Conway (w), Finn Allen, Kane Williamson (c), Glenn Phillips, Mark Chapman, James Neesham, Mitchell Santner, Tim Southee, Ish Sodhi, Lockie Ferguson, Trent Boult.)

ऑस्ट्रेलिया - अ‍ॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा, जोश हेझलवूड ( Australia (Playing XI): Aaron Finch (c), David Warner, Mitchell Marsh, Glenn Maxwell, Marcus Stoinis, Tim David, Matthew Wade (w), Pat Cummins, Mitchell Starc, Adam Zampa, Josh Hazlewood.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आॅस्ट्रेलियान्यूझीलंडस्टीव्हन स्मिथ
Open in App