T20 World Cup, AUS vs NZ Live : विराट कोहली Vs बाबर आजम यांच्या भांडणात न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे मोठा विक्रम नोंदवला, दोघांना मागे टाकले 

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 02:11 PM2022-10-22T14:11:29+5:302022-10-22T14:13:48+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, AUS vs NZ Live : Devon Conway becomes the 2nd fastest player in T20i history after Dawid Malan to score 1,000 runs, break Babar Azam and Virat Kohli record  | T20 World Cup, AUS vs NZ Live : विराट कोहली Vs बाबर आजम यांच्या भांडणात न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे मोठा विक्रम नोंदवला, दोघांना मागे टाकले 

T20 World Cup, AUS vs NZ Live : विराट कोहली Vs बाबर आजम यांच्या भांडणात न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे मोठा विक्रम नोंदवला, दोघांना मागे टाकले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 T20 World Cup, Australia vs New Zealand Live : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे  ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला जागा मिळालेली नाही, तर मार्टीन गुप्तील याला किवींनी बाकावर बसवले आहे. फिन अ‍ॅलन व डेव्हॉन कॉनवे यांनी किवींच्या डावाची सुरुवात केली आणि त्यानंतर कॉनवे व केन विलियम्सन यांनी  ऑस्ट्रेलियाला झोडून काढले. कॉनवेने अर्धशतक पूर्ण करताना एक मोठा विक्रम नावावर केला. 

अ‍ॅलनने पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कला चोपून काढले. तिसऱ्या चेंडूवर डाव्या बाजूला अ‍ॅलनने खेचलेला षटकार पाहण्यासारखा होता. जोश हेझलवूडचे स्वागत कॉनवेने चौकाराने केले. त्यानंतर अ‍ॅलनने दोन चौकार खेचले. तिसऱ्या षटकात अ‍ॅलनचा झेल अ‍ॅजम झम्पाकडून सुटला... हा झेल जरा अवघडच होता. पॅट कमिन्सच्या त्या षटकात अ‍ॅलनने १७ धावा चोपल्या. चौथ्या षटकात ऑसींना मार्कस स्टॉयनिसला बोलवावे लागले. पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाला हे वादळ रोखण्यात यश आलं. फिन १६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर जोश हेझलवूडच्या यॉर्करवर त्रिफळाचीत झाला.

वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सहा षटकांत १०+ चेंडूंचा सामना करून सर्वाधिक स्ट्राईक रेटचा विक्रम फिनने नाववर केला. २००९मध्ये आरोन रेडमंडने आयर्लंडविरुद्ध १८ चेंडूंत ४०* धावा केलेल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट २२२.२ इतका होता.  न्यूझीलंडने पहिल्या सहा षटकांत १ बाद ६९ धावा केल्या आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पॉवर प्लेमधील किवींची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 


कॉनवे व केन विलियम्सन यांनी धावांचा वेग कायम राखताना १० षटकांत संघाला ९७ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ४० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कॉनवेने आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली आणि ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कॉनवे व केन ( २३) यांची ५२ चेंडूंवरील ६९ धावांची भागीदारी झम्पाने संपुष्टात आणली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०००+ धावा करणाऱ्या फलंदाजांत कॉनवेने दुसरे स्थान पटकावले. डेव्हिड मलान ( २४ डाव) अव्वल स्थानावर आहे. कॉनवेने ( २६ डाव) आज बाबर आजम (२६) व विराट कोहली ( २७) यांचा विक्रम मोडला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: T20 World Cup, AUS vs NZ Live : Devon Conway becomes the 2nd fastest player in T20i history after Dawid Malan to score 1,000 runs, break Babar Azam and Virat Kohli record 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.