Join us  

T20 World Cup, AUS vs SL : OMG! Glenn Maxwell च्या मानेवर चेंडू वेगाने आदळला, वेदनेने कळवळत जमिनीवर झोपला, Video

T20 World Cup, Australia vs Sri Lanka : ऑस्ट्रेलियाला आव्हान कायम राखण्यासाठीच्या आजच्या लढतीत श्रीलंकेकडून कडवी टक्कर मिळतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 7:39 PM

Open in App

T20 World Cup, Australia vs Sri Lanka : ऑस्ट्रेलियाला आव्हान कायम राखण्यासाठीच्या आजच्या लढतीत श्रीलंकेकडून कडवी टक्कर मिळतेय... ग्लेन मॅक्सवेलने १०व्या षटकात ६ चेंडूंत २२ धावा कुटल्या, परंतु १३व्या षटकात लाहिरू कुमाराच्या बाऊन्सर त्याच्या मानेवर जोरात आदळला.. मॅक्सवेल हेल्मेट काढून लगेच बाजूला झाला अन् जमिनिवर गुडघ्यावर बसला... वैद्यकिय कर्मचारी धावले अन्... 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कुसल मेंडिस ( ५) माघारी परतल्यानंतर पथूम निसंका आणि धनंजया डी सिल्वा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. धनंजयाला २६ धावांवर बाद करून अ‍ॅगरने मोठं यश मिळवून दिलं आणि त्यानंतर निसंकाही ( ४०) रन आऊट झाला. भानुका राजपक्षा ( ७), वनिंदू हसरंगा ( १)  व दासून शनाका ( ३) हेही झटपट माघारी परतले. श्रीलंकेने ३६ धावांत ४ विकेट्स गमावल्या आणि ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. चरिथ असलंका व चमिका करुणारत्ने यांनी अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले आणि संघाला ६ बाद १५७ धावांपर्यंत पोहोचवले. असलंका ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला. 

डेव्हिड वॉर्नर व अ‍ॅरोन फिंच यांनी सकारात्मक सुरुवात केली, परंतु ऑस्ट्रेलियाचा कर्णधार चाचपडताना दिसला. त्याचे बरेच फटके इनसाईड एज लागून यष्टींवर आदळता आदळता वाचले. श्रीलंकने पाचव्या षटकात गोलंदाजीत बदल केला अन् फिरकीपटू महिषा थिक्सानाला बोलावले. थिक्सानाच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नर ( ११) दासून शनकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. श्रीलंकेने क्षेत्ररक्षणातही दमदार कामगिरी करताना यजमानांवर दडपण निर्माण केले होते आणि त्याचं फळ मिळालं. ९व्या षटकात मिचेल मार्श ( १८) झेलबाद झाला. पॉवर प्लेमध्ये ऑसींना एकही चौकार मारता आला नाही आणि ट्वेंटी-२० असे प्रथमच घडले. मात्र, याची भरपाई ग्लेन मॅक्सवेलने १०व्या षटकात केली. वनिंदूच्या त्या षटकात ( २ षटकार व १ चौकार) मॅक्सवेलने १९ धावा चोपल्या.

१२व्या षटकात लाहिरू कुमाराच्या चेंडूवर मॅक्सवेलच्या हाताला ईजा झाली. तिसरा चेंडू मॅक्सवेलच्या मानेवर आदळला अन् फलंदाजा  हेल्मेट काढून जमिनिवर लोळला... प्राथमिक उपचार घेऊन तो पुन्हा उभा राहिला. चमिका करुणारत्नेच्या षटकात फिंचचा झेल सुटला अन् दुसऱ्याच चेंडूवर मॅक्सवेलने मारलेला खणखणीत चेंडू सीमारेषेवर आशेन बंदाराने सुरेखरित्या टिपला. ऑस्ट्रेलियाला ८९ धावांवर तिसरा धक्का बसला.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ग्लेन मॅक्सवेलआॅस्ट्रेलियाश्रीलंका
Open in App