T20 World Cup, Australia vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला हार पत्करावा लागला. त्यामुळे आता स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. ग्रुप १ च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ तळाला आहे आणि आज त्यांच्यासमोर दुसऱ्या क्रमांकावरील श्रीलंकेचे आव्हान आहे. पण, करो वा मरो लढतीत त्यांच्यासमोर वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज अॅडम झम्पा ( Leg-spinner Adam Zampa) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आयसीसीच्या नियमानुसार तो आजच्या सामन्यात खेळू शकतो. ऑस्ट्रेलियन महिला संघानेही वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू खेळवला होता.
झम्पाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्याच्यात सौम्य लक्षणे दिसत आहे. आयसीसीच्या नियमानुसार कोरोन पॉझिटिव्ह खेळाडूही मॅच खेळू शकतो, परंतु त्याला सहकाऱ्यांपासून अंतर बनवून ठेवावे लागेल. झम्पाच्या जागी अॅश्टन अॅगरचा पर्यात ऑस्ट्रेलियासमोर आहे. पण, हाती आलेल्या माहितीनुसार झम्पालाच खेळवण्याचा निर्णय ऑसींनी घेतला आहे. याआधी आयर्लंडनेही जॉर्ज डक्रेल याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळवले होते. त्याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"