Join us  

T20 World Cup, AUS vs SL : David Warner ने भारी कॅच घेतला! श्रीलंकेच्या डावाला दिली कलाटणी, ऑस्ट्रेलियाची आव्हान टीकवण्यासाठी धडपड, Video 

T20 World Cup, Australia vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 6:15 PM

Open in App

T20 World Cup, Australia vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला हार पत्करावी लागली. त्यामुळे आता स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. आज श्रीलंकेविरुद्ध त्यांची कसोटी लागली. पथूम निसंका व धनंजया डि सिल्वा यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली, परंतु अखेरच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले. डेव्हिड वॉर्नरने ( What a catch by David Warner) सिल्वाचा घेतलेला झेल हा सामन्याला कलाटणी देणारा ठरला. क्षेत्ररक्षणातही वॉर्नरने सुरेख कामगिरी केली. 

T20 World Cup : India vs Pakistan सामन्यानंतर Sania Mirza ने पोस्ट केला Video, पाकिस्तानी चाहत्यांना झाला राग अनावर अन्... 

ग्रुप १ च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ तळाला आहे आणि आज त्यांच्यासमोर दुसऱ्या क्रमांकावरील श्रीलंकेचे आव्हान आहे. अ‍ॅडम झम्पा ( Leg-spinner Adam Zampa) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्याला आज आराम दिला गेला आहे.  झम्पाच्या जागी अ‍ॅश्टन अ‍ॅगरची निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात पॅट कमिन्सने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कुसल मेंडिसला ( ५) माघारी पाठवला.

पथून निसंका आणि धनंजया डी सिल्वा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाचं टेंशन वाढवलं होतं. ११व्या षटकात मार्कस स्टॉयनिसने टाकलेल्या चेंडूवर धनंजयाने मिड ऑनला उत्तुंग फटका मारला आणि डेव्हिड वॉर्नरने परतीचा झेल टिपलाही. पण, तोल सीमारेषेबाहेर जातोय असे दिसताच त्याने चेंडू फेकून दिला. वॉर्नरने संघासाठी ४ धावा वाचवल्या. १३व्या षटकात स्टॉयनिसने निसंकाचा सोपा झेल टाकला. धनंजयाला २६ धावांवर बाद करून अ‍ॅगरने मोठं यश मिळवून दिलं आणि त्यानंतर निसंकाही ( ४०) रन आऊट झाला. दोघानी ६९ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेचे दोन्ही सेट फलंदाज माघारी परतले.  

भानुका राजपक्षा ( ७) व दासून शनाका ( ३) हेही झटपट माघारी परतले. श्रीलंकेने ३६ धावांत ४ विकेट्स गमावल्या आणि ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. वनिंदू हसरंगाही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर  १ धावेवर झेलबाद झाला. चरिथ असलंका व चमिका करुणारत्ने यांनी अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले आणि संघाला ६ बाद १५७ धावांपर्यंत पोहोचवले. असलंका ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आॅस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरश्रीलंका
Open in App