कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती, परंतु सद्यपरिस्थिती पाहता वर्ल्ड कप होण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. पुढील आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात याबाबत बैठक होणार असून औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठी तीन पर्याय
- ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2021मध्ये फेब्रुवारी- मार्चमध्ये आयोजित केली जाऊ शकते, परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यासाठी तयार नाही. कारण लगेचच आयपीएल स्पर्धा आहेत आणि सलग 3-4 महिने ट्वेंटी-20 खेळून खेळाडूंची हालत खराब होऊ शकते. अशात भारताचा इंग्लंड दौराही आहे.
- 2021मध्ये भारतात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे. बीसीसीआय या वर्ल्ड कपचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला दिल्यास आणि 2022च्या वर्ल्ड कप आयोजन बीसीसीआयला दिल्यास. पण, बीसीसीआय त्यासाठी तयार नाही.
- ऑस्ट्रेलियात होणारा यंदाचा वर्ल्ड कप दोन वर्षांसाठी पुढे ढकलला जावा आणि 2022मध्ये ऑस्ट्रेलियाला यजमानपद देण्यात यावं.
''खेळाडूंच्या राहण्या खाण्याची योग्य ती सोय केली जाईल. पण, स्पर्धा झालीच तर ती प्रेक्षकांविना खेळवावी लागेल आणि त्याला काही अर्थ राहणार नाही. ऑस्ट्रेलियाला त्यातून मिळणारा महसूल गमवावा लागेल. त्यामुळे पुढे ही स्पर्धा आयोजित करून महसूल मिळवावा असा प्रयत्न आहे,'' अशी माहिती सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली.
आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...
दरम्यान, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले की,''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करावा, असा सल्ला बीसीसीआय का देईल? आम्ही बैठकीत चर्चा केली आणि जे काही योग्य आहे त्याबाबत आयसीसी निर्णय घेईल. ऑस्ट्रेलिया सरकार आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांना ही स्पर्धा होईल असा आत्मविश्वास वाटत असेल, तर ते निर्णय घेतील. बीसीसीआय त्यांना काही सल्ला देणार नाही.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर
टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral
Cricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार!
सुरेश रैना पाठोपाठ भारताच्या सलामीवीरानं मागितली परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी
आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...
Video : सहा वर्षाच्या पोरानं जगाला याड लावलंय; सिक्स पॅक अन् फुटबॉलला 3000 पेक्षा अधिक किक
.... तर IPL साठी देशांनी त्यांच्या खेळाडूंना पाठवू नये; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे आवाहन
Web Title: T20 World Cup in Australia all set to be postponed, formal announcement expected next week svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.