नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतात टी-२० विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यासाठी आयसीसीनेबीसीसीआयला २८ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आयसीसी बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी केले. विश्वचषकाचे आयोजन यंदा भारतात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे. बीसीसीआयने एक महिन्याचा वेळ मागितला होता. आयसीसीने तो सर्वसंमतीने दिला. आयसीसी बोर्डाच्या निकटस्थ सूत्रानुसार, आयसीसीने बीसीसीआयची विनंती मान्य केली असून, नव्या ठोस योजनेसह २८ जूनपर्यंत आयसीसीशी संपर्क करावा लागेल. बीसीसीआयने स्पर्धेचे आयोजन न केल्यास यूएईत हे आयोजन होईल. त्याआधी यूएईत १० ऑक्टोबरपर्यंत आयपीएल सामने खेळविले जातील. अशावेळी यजमानपदाचा अधिकार बीसीसीआयकडे कायम राहू शकतो. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये शक्य नसेल तर बीसीसीआय २०२२मध्ये आयोजनासाठी विंडो शोधत आहे. ९०० कोटींची कर सवलत हवीबीसीसीआय ९०० कोटींच्या कर सवलतीबाबत केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. सरकारच्या निर्णयाकडे बोर्डाचे लक्ष लागले आहे. याची माहिती आयसीसीला वेळोवेळी देण्याचे बोर्डाने आजच्या बैठकीत आश्वासन दिले. २०२३ ते २०३१ या आठ वर्षांत आयसीसीतर्फे चारवेळा विश्व कसोटी चॅम्पियनशिपचे आयोजन करण्याचा निर्णय आयसीसीने बैठकीत घेतला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- T20 World Cup: विश्वचषकाच्या निर्णयासाठी आयसीसीकडून बीसीसीआयला २८ जूनपर्यंत मुदत
T20 World Cup: विश्वचषकाच्या निर्णयासाठी आयसीसीकडून बीसीसीआयला २८ जूनपर्यंत मुदत
विश्वचषकाचे आयोजन यंदा भारतात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे. बीसीसीआयने एक महिन्याचा वेळ मागितला होता. आयसीसीने तो सर्वसंमतीने दिला.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 9:23 AM