Join us  

T20 World Cup, India vs Pakistan: भारत-पाकिस्तान वर्ल्डकप लढतीबाबत मोठी बातमी, क्रिकेट चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार! 

T20 World Cup, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत काय असते ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 10:04 AM

Open in App

T20 World Cup, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत काय असते ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमधील लढत आणि स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती नसली तर कसं चालेल. संपूर्ण स्टेडियमवर घुमणाऱ्या प्रेक्षकांच्या आवाजानं सामन्यात रोमांच निर्माण होतो. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या क्रिकेट सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात येत होते. पण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद यंदा बीसीसीआयकडे आहे आणि बीसीसीआयनं वर्ल्डकप क्रिकेट सामन्यांसाठी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या ७० टक्के प्रेक्षकसंख्या उपस्थितीला हिरवा कंदील दाखवला आहे. याचाच अर्थ भारत-पाकिस्तान लढत आता प्रेक्षकांना याची देही याची डोळा पाहता येणार आहे. 

ट्वेन्टी-२० वर्ल्डकप सामन्यांमध्ये आता स्टेडियममध्ये प्रत्येक विकेटवर आणि चौकार, षटकारांवर प्रेक्षकांचा आवाज स्टेडियममध्ये घुमणार आहे. यूएई आणि ओमानमध्ये वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली असून यासाठीची ऑनलाइन तिकीट विक्री देखील सुरू झाली आहे. आयसीसीच्या या मेगा इव्हेंटचा सुपर १२ स्टेजचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेतील सर्वात हाय प्रोफाइल सामना २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यात भारत-पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये सामना रंगणार आहे. 

तिकीट विक्रीला सुरुवात आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठीच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. यात १७ ऑक्टोबरपासून ते १४ नोव्हेंबरपर्यंत खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेचं तिकीट ओमानमध्ये १० ओमानी रियाल आणि यूएईमध्ये ३० दिरम इतकं असणार आहे. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार तिकीटांच्या खरेदीसाठी इच्छुकांना www.t20worldcup.com/tickets येथे भेट देऊन तिकीट विकत घेता येणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१टी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ
Open in App