आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर, पाकिस्तान संघाला चांगलच ट्रोल करण्यात येत आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या षटकात 5 गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना 176 धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानच्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 19 व्या षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयश्री मिळवली. त्यामुळे, आता 14 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामान्यात ऑस्ट्रेलियाचा ओपनर फलंदाज डेव्हीड वॉर्नरने वाद निर्माण केला. फलंदाजी करताना वॉर्नरने केलेल्या कृत्यामुळे माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर आणि हरभजनसिंग यांनी नाराजी संताप व्यक्त केला आहे. मोहम्मद हाफीजकडून गोलंदाजी करत असताना, चेंडू हातातून सटकला. त्यावेळी, वॉर्नरने पुढे येऊन त्या चेंडूवर उत्तुंग षटकार लगावला. मात्र, हा खेळ भावनेच्या विरुद्ध आहे, अनुभवी आणि दिग्गज खेळाडूकडून अशी अपेक्षा नसल्याचे इतर दिग्गज खेळाडूंनी म्हटले आहे.
हाफीजने 7 व्या षटकातील पहिला चेंडू टाकताना तो हातातून सटकला, त्यामुळे दोन टप्पे खावून हा पुढे आला. त्यावेळी, डेव्हीड वॉर्नरने एक पाऊल पुढे येत हा चेंडू सीमापार केला. सामाना संपल्यानंतर गौतम गंभीर आणि हरभजनसिंग यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. वॉर्नरे हा चेंडू खेळणे योग्य नव्हते, कारण तो हातातून सटकला होता, असा सूर दिग्गजांकडून उमटत आहे.
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज शेन वॉर्न आणि रिकी पाँटींग याबाबत काय बोलतील हे मी पाहू इच्छितो. कारण, अश्विनच्या माकडिंगवर त्यांनी मोठी चर्चा केली होती. खेळाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. वॉर्नरसारख्या खेळाडूला हे शोभा देत नाही. या खेळात प्रत्येकाची वेळ येते. म्हणूनच 49 धावांवर वॉर्नर बाद झाला, असे गौतम गंभीरने म्हटले आहे. तर, भज्जीनेही वॉर्नरला चांगलंच सुनावलंय.
ऑस्ट्रेलियाची वर्तणूकच अशी राहिली आहे. ग्रेग चॅपलनेही असंच केलं होतं. जेव्हा त्यांनी अंडर आर्म गोलंदाजी करण्याचं लाजीरवाणं कृत्य केलं होतं. रिकी पाँटींग काय बोलणार, त्यांनी तर स्वत:च असं केलं होतं. एका सामन्यात झेल घेताना चेंडू जमिनीला स्पर्श करत होता, त्यावेळी त्यांनी स्वत:च अम्पायर बनून आऊट असल्याचा निर्णयही दिला होता, अशी आठवण भज्जीने सांगितली.