Join us  

T20 World Cup : महेंद्रसिंग धोनी अन् रवी शास्त्री यांच्यात खटके उडाले?; टीम इंडियाच्या पराभवानंतर फोटो झाला व्हायरल

T20 World Cup: Shastri & Dhoni in animated conversation: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 6:04 PM

Open in App

T20 World Cup: Shastri & Dhoni in animated conversation: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानं टीम इंडियाचा पुढील मार्ग खडतर केला आहे. रवी शास्त्री- मुख्य प्रशिक्षक, विराट कोहली - कर्णधार आणि महेंद्रसिंग धोनी - मार्गदर्शक असं सगळं असूनही टीम इंडियाच्या लाजीरवाण्या कामगिरीवर सडकून टीका केली जात आहे. आता टीकेसाठीही शब्द कमी पडलेत, अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार कपिल देव यांनी दिली. भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) यांच्यातल्या सामन्यादरम्यान MS Dhoni आणि Ravi Shastri यांच्यातील संभाषण Live Matchमध्ये कॅमेरामननं टिपलं. व्हायरल झालेल्या फोटोवरून धोनी व शास्त्री यांच्यात  वादाचे फटाके फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पुन्हा शरणागती पत्करली. किवी गोलंदाजांनी एकेका धावेसाठी भारतीय फलंदाजांना तरसवले आणि त्याच दपडणात ते विकेट देऊन  फसले. भारतीय फलंदाजांच्या या शरणागतीवर धोनी प्रचंड चिडला आणि त्यानं सामना सुरु असतानचा शास्त्री यांच्याशी संवाद साधला.  त्याचवेळी कॅमेरामननं त्यांच्याकडे कॅमेरा वळवला होता. धोनी व शास्त्री यांच्यात कोणताही वाद किंवा भांडण झालेलं नाही. फक्त फलंदाजांच्या अपयशावरून दोघंही नाराज दिसले.   

सामन्यात काय झालं?न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीचा क्रम बदलणे, टीम इंडियाला महागात पडले. इशान किशन व लोकेश राहुल या जोडीचा सलामीसाठी प्रयोग झाला. रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून स्वतः कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आला. रिषभ पंतसह हे सर्व फ्लॉफ ठरले. हार्दिक पांड्या २३ व रवींद्र जडेजा नाबाद २६ धावा करून संघाला ७ बाद ११० धावांपर्यंत मजल मारून दिली. न्यूझीलंडनं डॅरील मिचेलनं ४९ धावा करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. मिचेल ३५ चेंडूंत  ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला आणि केनसह त्याची ७२ धावांची भागीदारीही संपुष्टात आलीकेन विलियम्सन ३३ धावांवर नाबाद राहिला आणि मार्टीन गुप्तील २० धावांवर बाद झाला. भारतासाठी दोन्ही विकेट्स जसप्रीत बुमराहनं घेतल्या. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१महेंद्रसिंग धोनीरवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ
Open in App