Join us  

T20 World Cup Final ENG vs PAK : पाकिस्तान-इंग्लंड यांच्यातली आजची फायनल उद्या होणार? मेलबर्नवरून हवामानाचे थेट अपडेट्स 

T20 World Cup Final ENG vs PAK, Melbourne Weather Report :  पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलसाठी सारे  सज्ज झाले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 11:41 AM

Open in App

T20 World Cup Final ENG vs PAK, Melbourne Weather Report :  पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलसाठी सारे  सज्ज झाले आहेत. दोन्ही संघ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पोहोचले आहेत. पण, आजचा हा सामना पावसामुळे उद्या खेळवला जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. मेलबर्नच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज ८०-९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजता पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे आणि अशात पाकिस्तान-इंग्लंड सामना राखीव दिवशी खेळवला जाऊ शकतो.

''ढग दाटून आले आहेत आणि १०० टक्के पावसाची शक्यता आहे. वादळी वाराही सुटला असल्याने मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. ताशी १५ ते २५ किमी वेगाने हवा सुटली आहे आणि सायंकाळी हा वेग अधिक वाढण्याचा अंदाज आहे,''असे ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. फायनलसाठी सोमवारचा दिवस राखीव म्हणून ठेवला गेला आहे, परंतु सोमवारीही ९५ टक्के पावसाची शक्यता आहे.  

दोन्ही दिवस पावसाने वाया गेल्यास काय?

  • किमान १० षटकांचा सामना होणे गरजेचे आहे, परंतु हवामानाच्या अंदाजानुसार तेवढी षटकं होणे अवघड आहे.
  • आयसीसीकडून कोणत्याही परिस्थिती हा सामना खेळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील.
  • आज  किमान षटकं झाली नाहीत, तर सामना राखीव दिशी होईल आणि तेव्हाही पावसाचा व्यत्यत आल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल.

१९९२च्या फायनलची पुनरावृत्ती?१९९२ला इंग्लंडला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. तथापि इम्रान खानच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ जगज्जेता बनला. बाबर आझमचा संघ भारताला दुसऱ्या उपांत्य लढतीत निर्दयीपणे एकतर्फी नमविणाऱ्या इंग्लंडची शिकार करू शकेल? १९९२ प्रमाणे इंग्लिश खेळाडूंची घोडदौड थांबविण्यासाठी पाकला विशेष कामगिरी करावीच लागेल. उत्कृष्ट रणनीती, सांघिक कामगिरीसह चालून आलेल्या संधीचे सोने करण्याची प्रेरणा जोपासल्यास पाकिस्तान सामन्याचे पारडे स्वत:कडे फिरवू शकेल.

१९९२च्या अंतिम लढतीत इम्रान आणि जावेद मियांदाद यांनी फलंदाजीत मोठी भागीदारी करीत धावसंख्येला आकार दिला होता. त्यामुळे गोलंदाजांना लक्ष्याचा यशस्वी बचाव करता आला. रविवारी बाबर-रिझवान यांच्याकडून अशाच मोठ्या खेळीची अपेक्षा असावी. त्यावेळी इंग्लंडचे फलंदाज विजयाकडे वाटचाल करीत असल्याचे ध्यानात येताच वसीम अक्रमने ॲलन लॅम्ब-ख्रिस लुईस यांचा अडथळा सलग चेंडूवर दूर करीत सामना जिंकेपर्यंत चतुरस्र मारा सुरूच ठेवला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानइंग्लंडपाऊसआयसीसी
Open in App