T20 World Cup, David Warner : डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीनं सनरायझर्स हैदराबादला ट्रोल केलं; म्हातारा, संथ म्हणणाऱ्यांनाही सुनावलं! 

T20 World Cup Final : David Warner's wife Candice silences critics  - वॉर्नरला आयपीएल २०२१च्या ८ सामन्यांत १९५ धावाच करता आल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादनं तर त्याला अखेरच्या काही सामन्यांत प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 10:39 AM2021-11-15T10:39:39+5:302021-11-15T10:40:16+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup Final : David Warner's wife Candice silences critics after Aus opener guides Finch & Co. to maiden T20 WC title   | T20 World Cup, David Warner : डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीनं सनरायझर्स हैदराबादला ट्रोल केलं; म्हातारा, संथ म्हणणाऱ्यांनाही सुनावलं! 

T20 World Cup, David Warner : डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीनं सनरायझर्स हैदराबादला ट्रोल केलं; म्हातारा, संथ म्हणणाऱ्यांनाही सुनावलं! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Final : David Warner's wife Candice silences critics  - ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे पहिले जेतेपद पटकावताना न्यूझीलंडवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) पटकावला. सेमी व फायनल सामन्यात वॉर्नरनं त्याच्या फलंदाजीच्या तडाख्यानं प्रतिस्पर्धी संघांना हादरवून सोडलं. वॉर्नरच्या या भन्नाट कामगिरीनंतर त्याची पत्नी कॅनडीस वॉर्नर ( Candice Warner ) हिनं सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) सह टीकाकारांना टोमणा हाणला.

न्यूझीलंडच्या ४ बाद १७२ धावांचा ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पाठलाग केला. किवी  कर्णधार केन विलियम्सननं  ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूनंच त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श ही जोडी तुफान खेळली.  वॉर्नर ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला.  मार्श ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलनं नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत ८ विकेट्स राखून विजय मिळवला. 

ऑस्ट्रेलियाचे हे सहावे जागतिक जेतेपद ठरले. त्यांनी पाच वेळा ( 1987, 1999, 2003, 2007, 2015)  वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे.  या ऐतिहासिक जेतेपदानंतर वॉर्नरची पत्नी कॅनडिसनं टीकाकारांना ट्रोल केलं. तिनं ट्विट केलं की,''Out of form, too old and slow! डेव्हिड वॉर्नर'' कॅनडिसनं या ट्विटमधून आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद आणि टीकाकारांना टोमणा मारला.  



वॉर्नरला आयपीएल २०२१च्या ८ सामन्यांत १९५ धावाच करता आल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादनं तर त्याला अखेरच्या काही सामन्यांत प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर केले. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात त्याच्याकडून नेतृत्वपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आणि त्याला खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाण्यास भाग पाडले.   

Web Title: T20 World Cup Final : David Warner's wife Candice silences critics after Aus opener guides Finch & Co. to maiden T20 WC title  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.