Join us  

T20 World Cup Final ENG vs PAK : सन्नाटा! आदिल रशीदने पाकिस्तानच्या बाबर आजमला 'मामू' बनवला; इंग्लंडने फास आवळला, Video 

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरलेल्या कर्णधार बाबर आजमने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लय पकडली. आज तो पाकिस्तानसाठी खिंड लवढत होता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 2:42 PM

Open in App

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : मोहम्मद रिझवानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये अपयश आले. दोन जीवदान मिळूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही. संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरलेल्या कर्णधार बाबर आजमने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लय पकडली. आज तो पाकिस्तानसाठी खिंड लवढत होता, परंतु आदिल रशीदने ( Adil Rashid) त्याल चूक करण्यास भाग पाडले. बाबरच्या विकेटने मेलबर्नवर सन्नाटा पसरला. त्यात बेन स्टोक्सने त्यांना चौथा धक्का दिला. रशीदने बाबरची विकेट घेतलीच, शिवाय ते षटक निर्धाव फेकले.  

दोन वेळा वाचला, पण अखेर फसला! मोहम्मद रिझवानचा त्रिफळाच उडाला, सॅम कुरनने धक्का दिला, Video 

बेन स्टोक्सने No Ball, Wide Ball ने इनिंग्जची सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तानला पहिलाच चेंडू फ्री हिट मिळाला, परंतु स्टोक्सने मोहम्मद रिझवानला त्याचा फायदा उचलू दिला नाही. चौथ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनचा डायरेक्ट हिट चूकला अन् रिझवानला जीवदान मिळाले. १९९२च्या वर्ल्ड कपमध्येही नो बॉलने पाकिस्तानच्या धावांची बोहनी झाली होती आणि आजही तसेच झाले. रिझवान व बाबर यांनी हळुहळू धावांचा वेग वाढवण्यास सुरुवात केली, पण त्याचवेळी इंग्लंडने हुकूमी एक्का काढला. सॅम कुरनने त्याच्या पहिल्याच षटकात रिझवानचा ( १५) त्रिफळा उडवून पाकिस्तानला धक्का दिला. 

 

रिझवान यापूर्वी दोन वेळा रन आऊट होता होता वाचला. मोहम्मद हॅरीसने काही सुरेख फटके मारून पाकिस्तानी चाहत्यांना खुश केले, परंत आदिर रशीदने त्याच्या पहिल्याच षटकात हॅरीसला गप्प केले. हॅरीसने पुढे येऊन टोलावलेला चेंडू बेन स्टोक्सने सहज टिपला. बाबर एका बाजून पाकिस्तानची खिंड लढवत होता आणि त्याने शान मसूदसह २४ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली. रशीदने ही भागीदारी संपुष्टात आणली. रशीदने स्वतःच्याच गोलंदाजीवर रिटर्न झेल टिपला अन् बाबर ३२ धावांवर माघारी परतला. बेन स्टोक्सने इफ्तिखार अहमदची ( ०) विकेट घेत पाकिस्तानला चौथा धक्का दिला. रशीदने ४ षटकांत २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानबाबर आजमइंग्लंड
Open in App