Join us  

T20 World Cup Final ENG vs PAK : खेळाडूच्या अचानक निधनाने इंग्लंडच्या संघावर शोककळा; काळी फित बांधून उतरले मैदानावर  

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : १९९२च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पुनरावृत्तीच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 1:50 PM

Open in App

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : १९९२च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पुनरावृत्तीच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरावे लागणार आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मार्क वूड व डेवीड मलान यांना तंदुरुस्तीच्या कारणास्तव फायनलमध्येही खेळता येणार नाही. त्यामुळे इंग्लंडने उपांत्य फेरीतील संघ कायम राखण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही कोणताच बदल झालेला नाही. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या सामन्यात पावसाचे सावट अजूनही कायम आहे. सध्या तेथील वातावरण ढगाळ दिसतेय आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात फायनलमध्ये टॉस जिंकणाऱ्या संघांनी ७ पैकी ६ वेळा विजय मिळवले आहेत. २००९मध्ये पाकिस्तानने नाणेफेक गमावूनही जेतेपद उंचावले होते आणि यंदाही त्यांच्या चाहत्यांना या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. बेन स्टोक्सने No Ball, Wide Ball ने इनिंग्जची सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तानला पहिलाच चेंडू फ्री हिट मिळाला, परंतु स्टोक्सने मोहम्मद रिझवानला त्याचा फायदा उचलू दिला नाही. चौथ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनचा डायरेक्ट हिट चूकला अन् रिझवानला जीवदान मिळाले. 

दरम्यान, इंग्लंडचे खेळाडू हातावर काळी फित बांधून मैदानावर उतरलेले दिसले. इंग्लिश क्रिकेटचे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे डेव्हिड इंग्लिश ( David English) यांचे शनिवारी रात्री ७६व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सुरू केलल्या बनबरी स्कूल फेस्टीवलमधून १००० हून अधिक प्रथम ८ श्रेणी क्रिकेटपटू, त्यात १२५ हू्न अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२इंग्लंडपाकिस्तान
Open in App